सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट उद्या म्हणजेच बुधवारपासून ऑनलाइन उपलब्ध करून दिले जणार असून विद्यार्थी 31 जानेवारीपासून आपलं हॉल तिकीट ऑनलाइन मिळवता येणार आहे.
इयत्ता दहावीचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) डाऊनलोड कसे करावे?
● सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in ला भेट द्या
● SSC परीक्षा निवडा.
● नवीन विंडो उघडेल.
● आपले यूजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
● आवश्यक असणारा तपशील प्रविष्ट करा.
● तपशील प्रविष्ट केलेल्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र आपल्या स्क्रिनवर दिसेल.
● ‘डाऊनलोड’ या पर्यायावर क्लिक करा.
● प्रवेशपत्र डाऊनलोड करून सेव्ह करा.
● सेव्ह केलेल्या प्रवेशपत्राची प्रिंट आऊट काढा.
मंडळाने दिलेल्या 'स्कूल लॉगिन'मध्ये हे हॉल तिकीट डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध असेल. दहावीच्या परीक्षेसाठी सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट करून द्यायचे आहेत. हॉल तिकीट प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. तसेच त्या हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
उद्यापासून ऑनलाइन मिळेल 10 वी परीक्षेचं हॉल तिकीट, असं करा डाऊनलोड..!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 30, 2024
Rating: