आजपासून मार्डी येथे भव्य कबड्डी चे खुले सामने,दोन लाख एकोणसाठ रुपयांची भव्य बक्षिसे

   
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
        
मारेगावतालुक्यातील मार्डी येथे न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ मार्डी चे वतीने कबड्डीचे खुले सामने आयोजित करण्यात आले असून दिनांक ३१ जानेवारी ला उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे.दिनांक ३१ जानेवारी,१ व २ फेब्रुवारी या कालावधीत प्राथमिक शाळेचे पटांगणात हे सामने पार पडणार आहे.
यावर्षी प्रथमच महिला कबड्डी खेळाडूंना संधी मिळणार असून महिलांच्या 'अ' गटाकरिता प्रथम बक्षीस ३१०००, द्वितीय बक्षीस २१०००, तृतीय बक्षीस ११०००तर चतुर्थ बक्षीस ५००० तर पुरुष 'अ' गटाकरिता प्रथम बक्षीस ५१००० रुपये, द्वितीय बक्षीस ३१००० रुपये, तृतीय बक्षीस २१००० रुपये, चतुर्थ बक्षीस ११००० तर पुरुष 'ब' गटात प्रथम बक्षीस ३१०००,द्वितीय बक्षीस २१००० ,तृतीय बक्षीस १५०००रुपये,आणि चतुर्थ बक्षीस १०००० रुपये अशी चार बक्षिसे असून त्या व्यतिरिक्त गिफ्ट हेम्पर, चषक आणि वैयक्तिक बक्षिसे आहेत.
या सामन्यात सहभागी होणाऱ्या महिला गटाकरिता ७००₹,पुरुष 'अ' गटाकरिता १०००₹,आणि 'ब' गटाकरिता ८००₹ प्रवेश फी आहे.तरी या कबड्डीचे खुले सामन्याचा जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अक्षय सराटे, उपाध्यक्ष रुपेश जुमनाके, सचिव समाधान सिरामे आणि समस्त पदाधिकारी,सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आजपासून मार्डी येथे भव्य कबड्डी चे खुले सामने,दोन लाख एकोणसाठ रुपयांची भव्य बक्षिसे आजपासून मार्डी येथे भव्य कबड्डी चे खुले सामने,दोन लाख एकोणसाठ रुपयांची भव्य बक्षिसे          Reviewed by सह्याद्री चौफेर on January 30, 2024 Rating: 5
Powered by Blogger.