सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य रुग्णांना महागडे उपचार घेणे परवडत नाही, शिक्षण असून देखील प्रचंड प्रमाणात वाढलेल्या बेरोजगारीमुळे तरुणांना आर्थिकदृष्टया घरचांना मदत करणे शक्य होत नाही, रोजगार न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून व्यसनाधीनता वाढता आहे, मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. स्पर्धा परीक्षामधील गैरप्रकार आणि पेपरफुटीमुळे तरुणामध्ये मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने आरोग्यावर खर्च करणे देखील शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. आर्थिक परीस्थिती बेताची असल्यास अनेक महिला दुखणे हे अंगावर काढतात, महिलांच्या आरोग्याकडे सरकारचे लक्ष नाही.
आणि सरकारच्या हुकुमशाही कारभारामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. गरजू आणि गरिबांना उपचार मिळणे अवघड झाले आहे.
सध्याच्या स्थितीत सर्वसामान्य गरजू लोकांना महागडा उपचार परवडत नसल्याने सामाजिक दायित्व जोपासत काँग्रेस व विजयकिरण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, यकृताचे आजार 45 हुन हून अधिकत रक्ताच्या तपासण्या,किडनी विकार, मानसिक आजार, त्वचारोग, टी बी, अस्थीरोग, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, रक्तदोष, श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, तसेच अत्याधुनिक मॅमोग्राफी मशीन (स्तनाच्या कॅन्सर चे निदान), अत्याधुनिक X RAY मशीन (सर्व प्रकारचे x ray), अद्ययावत पॅथॉलॉजी प्रयोग शाळा (45 हून अधिक प्रकारच्या रक्ताच्या तपासणी), अद्ययावत दंत चिकित्सा युनिट, मुख कर्करोग तपासणी (ECG, रक्तदाब, पल्सरेट, बॉडी मास इंडेक्स, ब्लड शुगर स्पायरोमेट्रि, फुफ्फुस क्षमता तपासणी), लहान मुलाचे श्वसनाचे आजार, गर्भवती स्त्रियांमध्ये eclampsia व preeclampsia चे निदान
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनकडून मोफत तपासणी करण्यात येणार आहेत.
तरी मार्डी परिसरातील गरजू गरीब लोकांनी उद्या बुधवार रोजी होणाऱ्या भव्य शिबिराचा लाभ घ्यावा असे, आवाहन मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
उद्या मार्डी येथे कॅन्सर तपासणी हॉस्पिटल शिबिराचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 30, 2024
Rating: