सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या वर्धा नदीच्या काठा जवळील शिवणी (धोबे) या गावाला पुराचा दरवर्षी तडाखा मोठ्या प्रमाणात बसत असतो.या तडाख्यामुळे दरवर्षी अनेक घरांची परझड, नुकसान होत आहे. त्यामुळे पूरग्रस्त लाभार्थ्यांना घरकुल द्या अशी मागणी शिवणी धोबे येथील ग्रामस्थांची आहे.
तालुक्यातील शिवणी धोबे येथे आता मोदी आवास योजनेचे 33 घराचे उदिष्ट ग्रामपंचायतला आले होते. त्यामध्ये ग्रामपंचायतने 33 जणांची लिस्ट बनवुन ग्रामपंचायत ठराव सादर करण्यात आला होता. परंतु तक्रारीअंती चौकशी अंतर्गत त्यातील 14 लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले. अशी तक्रार आज मंगळवारला पंचायत समिती कार्यालयाला देण्यात आली.
विशेष म्हणजे शिवणी धोबे हे गाव वर्धा नदीच्या तिरावर असुन पावसाळ्यामध्ये पुर्ण गाव पाण्याखाली येत असते, त्यामुळे येथील पूरग्रस्त लोकांनी विटा,सिमेंट व छतावर टिनपत्रे व कवेलु टाकुन तात्पुरती राहण्याची आपापल्या व्यवस्था केली आहे. मात्र,त्या घरांना पक्के घर असे संबोधू नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष रुपेश ढोके यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तूर्तास अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना ग्राम.पं. ने दिलेल्या ठरावानुसार मोदी आवास योजनेत समाविष्ट करून पुरग्रस्त त्या अपात्र लोकांना लाभ देण्यात यावा, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात उपोषण करण्यात येईल असा ईशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी गावातील सरपंच निलेश रासेकर, रमेश ढोके, ज्ञानेश्वर धोबे तसेच मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश ढोके यांचे सह शिवणी धोबे येथील लाभार्थी उपस्थित होते.
पूरग्रस्त लाभार्थ्यांना घरकुल द्या - शिवणी धोबे येथील ग्रामस्थांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 30, 2024
Rating: