सुमधुर गीतांचा कार्यक्रम संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 23 ते 25 जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. दरम्यान विविध विषयावरील कार्यक्रम सादर झाले व तसेच या संमेलनात सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यात अभिजित पंढरपूरे आणि आकाश कुमरे व संच यांनी एकापेक्षा एक सुमधुर गीत सादर केले, गायक अभिजित पंढरपूरे यांच्या गोड आवाजात प्रथम गायलेल्या श्रीराम की जानकी या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर गायक आकाश कुमरे यांच्या ठसकेबाज आवाजात तुझ्या रूपाचं चांदणं या मराठी गाण्याने सदर कार्यक्रमाची सांगता झाली. साथसंगत सुमित ठमके, कुमारबादल कुमरे, बँजो वादक डॉ. वी.पी. गेडाम सर, हार्मोनियम प्रशांत ठाकूर, तबला व ढोल लोखंडे बंधू यांची लाभली होती.
कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य डॉ. घरडे सर व तसेच प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.

उत्कृष्ट संच म्हणून अभिजित पंढरपूरे आणि आकाश कुमरे व संच, यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सुमधुर गीतांचा कार्यक्रम संपन्न  सुमधुर गीतांचा कार्यक्रम संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on January 29, 2024 Rating: 5
Powered by Blogger.