भारतीय बौद्ध महासभा तथा वंचित बहुजन आघाडीतर्फे इव्हीएम विरोधात महामहिम राष्ट्रपतींना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : इव्हीएम (EVM) यंत्र हटवा, मतदान मत पत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) चा वापर करा आणि लोकशाही वाचवा, या मागण्यांसाठी आज सोमवार ला भारतीय बौद्ध महासभा तथा वंचित बहुजन आघाडी च्या तालुका शाखेतर्फे तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदयांना (भारत सरकार नवी दिल्ली) देण्यात आले.

26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान संपूर्ण भारतात लागू झाले असुन समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या चार मुलभूत तत्वावर आधारीत असुन धर्मनिरपेक्षता हा त्या संविधानाचा गाभा आहे. परंतु अलीकडे ईव्हीएम यंत्रातील मतदारात संभ्रम निर्माण झाला असून EVM द्वारे दिलेले मत शंभर टक्के मत त्याच प्रतिनिधीला मिळेल की नाही, याबाबत शंका अधिक दृढ होत चाललेली आहे. त्याप्रकारचे EVM बाबतचे हे वातावरण संपूर्ण देशाला दिसत आहे. लोकशाही देशासाठी इव्हीएम यंत्र घातक असल्यामुळे स्वच्छ व नि:पक्ष वातावरणात सन 2024 ची व त्या पुढील निवडणूक होण्यासाठी 'इव्हीएम हटाओ देश बचाओ' या विषयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. मतदान (बॅलेट पेपर) वर करा वापर आणि लोकशाही वाचवा अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ पूर्व चे जिल्हाध्यक्ष भगवान इंगळे, वंचित बहुजन आघाडी चे मारेगाव तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, संजय जिवने (उपाध्यक्ष), नूतनताई तेलंग (वं.ब.आ महिला ता. अध्यक्ष), सुवर्णाताई नरांजे (वं.ब.आ. महिला शहर अध्यक्ष), अनंता खाडे, राहुल आत्राम (जिल्हाध्यक्ष क्रांतिवीर शामदादा कोलाम संघटना, यवतमाळ) यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभा तथा वंचित बहुजन आघाडीतर्फे इव्हीएम विरोधात महामहिम राष्ट्रपतींना निवेदन भारतीय बौद्ध महासभा तथा वंचित बहुजन आघाडीतर्फे इव्हीएम विरोधात महामहिम राष्ट्रपतींना निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on January 29, 2024 Rating: 5
Powered by Blogger.