टॉप बातम्या

धनादेशाचा अनादर, 6 महिन्यांची शिक्षा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : हातउसणे घेतलेल्या रकमेची परतफेड न करता त्याऐवजी धनादेश देऊन अनादर झाल्याप्रकरणी स्वाती विकास बोबडे ह. मु डोंबिवली ईस्ट, जि. ठाणे यांना दोषी ठरवत येथील न्यायदंडाधिकारी निलेश वासाडे यांनी 6 महिन्यांचा कारावास व 5 लाख 20 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

शिक्षा झालेल्या स्वाती बोबडे हिने प्रवीण साधुजी भट रा. वणी यांच्याकडून हातउसणे पैसे घेतले होते. पैसे परत करतेवेळी भट यांना धनादेश दिला. परंतु तिच्या बँक खात्यात रक्कम नसल्याने धनादेश अनादर झाला. त्यामुळे प्रवीण भट यांनी न्यायालयात धाव घेत प्रकरण न्यायप्रविष्ट केले, न्यायाधीश नीलेश वासाडे यांनी साक्षपुरावे आणि युक्तिवाद ऐकून स्वाती विकास बोबडे हिला धनादेशप्रकरणी दोषी ठरवून सहा महिन्यांचा कारावास व रक्कम प्रवीण भट यांना अदा करण्याचा आदेश नुकताच दिला. फिर्यादीतर्फे अॅड. पी. एम. पठाण यांनी बाजू मांडली.
Previous Post Next Post