अवैध दारु विक्री बंद करा - गोंडबुरांडा येथील महिलांची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील गॉडबुरांडा येथे सुरु असलेली अवैध दारु विक्री कायमची बंद करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन आज सोमवारला असंख्य महिलांनी मारेगाव गाठून ठाणेदार जनार्धन खंडेराव यांना देण्यात आले.

गावात मागील चार-पाच महिण्यापासून कुंभा येथील एक प्रशांत नामक व्यक्ती अवैध दारु विक्री करीत आहे. सदर बाब पोलीस पाटील, सरपंच व तंटामुक्ती यांना सांगुन बैठक बोलावुन सविस्तर चर्चा करुन त्या दारु विक्रेत्याला समाजावून सांगण्यात सुद्धा आले. परंतु गावातील पोलीस पाटील, सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष यांचे सुध्दा तो ऐकायला तयार नाही. उलट "तुमच्याने जे होते ते करुन घ्या, मी माझे दारु विक्रीचा व्यवसाय बंद करणार नाही" असे बोलून अश्लिल शिवीगाळ करुन धमकी देत असतो. असे 'निवेदनात नमूद आहे.

पुढं असेही तक्रारीत म्हटलं आहे की, या अवैध दारु विक्रीमुळे गावात अशांतता निर्माण झालेली असून गावातील तरुण, होतकरु व्यक्ती व्यसनाधीन खूप झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असून गावात रोज झगडे भांडण सुरु असते. तसेच या दारु विक्रेत्याची हिंमत जास्तच वाढली असून सदर व्यक्ती हा धमकावत असतो. त्यामुळे सदर अवैध दारु विक्रेत्यावर योग्य ती कार्यवाही करुन त्वरीत येथील अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी गोंडबुरांडा येथील महिलांनी केली.

निवेदन देताना ग्रापं. सदस्य अनुसया शेडमाके, पौर्णिमा उरवते, चंदा जुमनाके, शांता आत्राम, कानाबाई शेंदरे, शिला आत्राम, कलाबाई टेकाम, बालीबाई आत्राम, शालीनी रामपुरे, शोभा आत्राम, अनिता आत्राम, रीना रामपूरे, जणाबाई आत्राम, लक्ष्मी आत्राम यांच्या सह असंख्य महिला उपस्थित होत्या.
अवैध दारु विक्री बंद करा - गोंडबुरांडा येथील महिलांची मागणी अवैध दारु विक्री बंद करा - गोंडबुरांडा येथील महिलांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on January 29, 2024 Rating: 5
Powered by Blogger.