सन २०२४ मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : सन २०२४ मध्ये राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रम साजरे करण्याचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. यामध्ये दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत, असे परिपत्रकात नमूद आहे.

परिपत्रकामधील सर्व कार्यक्रम विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात आयोजित करण्याबाबत सूचना देऊन अंमलबजावणीबाबत कार्यवाही करावी, असेही परिपत्रकात नमूद आहे.

सन २०२४ मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित सन २०२४ मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित Reviewed by सह्याद्री चौफेर on December 28, 2023 Rating: 5
Powered by Blogger.