भाजपची धुरा जाणत्यांकडेच; मारेगाव तालुका अध्यक्ष पदी अविनाश लांबट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : भाजपात दाखल झालेले व कमी वेळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदावर झेप घेणारे अविनाश लांबट यांची भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. 

भारतीय जनता पार्टी, यवतमाळ जिल्ह्यातील मंडळ अध्यक्ष पदाची घोषणा पत्रकान्वये काल जाहीर करण्यात आली आहे. मारेगाव तालुक्याची भाजपची धुरा जाणत्यांकडेच दिल्याने आता पक्षाला मोठी संजीवनी मिळणार आहे.

विशेष म्हणजे तालुका अध्यक्ष पदाकरिता चार उमेदवारांनी आपली इच्छा जाहीर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती, यात विद्यमान ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शशिकांत आंबटकर (काका), गणेश झाडे, अविनाश लांबट यांनी अध्यक्ष पद पदरात पाडून घेण्यासाठी खटाटोप सुरु केला. परंतु पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार दोघांना माघार घ्यावी लागली,तर उरले दोन. दोन पैक श्री लांबट सोडले तर इतरांचा तालुक्यात पाहिजे तसा फारसा जमघट नसल्याने त्यांनाही अध्यक्ष पद मिळवता आले नाही असे समजते. त्यामुळे अल्पवाधित आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अगदी निकट मानले जाणारे, राजकीय, सामाजिक तथा सामान्यांच्या कार्यात, मदतीला एका हाकेला धावून जाणारे, मारेगाव तालुक्यात लोकप्रिय, मनमिळाऊ स्वभावाने ओळखले जाणारे अविनाश लांबट यांची भाजप च्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी अखेर वर्णी लागली. त्यांच्या कडे सर्वानुमते तालुक्याची जबाबदारी देण्यात आली.

या निवडीबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, सोशल च्या माध्यमातून राजकीय, सामाजिक क्षेत्रासह त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याबाबत अविनाश लांबट यांच्याशी संवाद साधला असता नवनिर्वाचित अध्यक्ष श्री लांबट म्हणाले, वणी मतदारसंघाचे आमदार संजीव रेड्डी बोदकुलवांर यांच्या विकासात्मक कामाला प्रेरीत होऊन आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या निवडीचे श्रेय त्यांनी सन्माननीय माजी मंत्री हंसराज भैय्या अहिर, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे असल्याचे 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले.

तालुक्यातील जनमानसात स्वच्छ प्रतिमा असल्याने पक्षाने त्याची निवड तालुका अध्यक्ष पदी केल्याने सर्व स्तरांतून त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे. त्यांची निवड आगामी काळात करिश्मा करणारी ठरणार आहेत.


भाजपची धुरा जाणत्यांकडेच; मारेगाव तालुका अध्यक्ष पदी अविनाश लांबट भाजपची धुरा जाणत्यांकडेच; मारेगाव तालुका अध्यक्ष पदी अविनाश लांबट Reviewed by सह्याद्री चौफेर on December 28, 2023 Rating: 5
Powered by Blogger.