सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : दिवसागणिक आत्महत्येच्या घटनेत वाढ होत आहे. काल हटवांजरी येथील इसमाची आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना तालुक्यातील आणखी चिंचाळा येथील एका वृद्धाने आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली.
भाऊराव सदाशिव थेटे (70) असे वृद्धाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी साडे सात वाजता च्या दरम्यान त्यांनी राहत्या घरी विष प्राशन केले. वृद्धाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तपासणी अंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप तरी अस्पष्ट असून मृतकाच्या पाठीमागे एक मुलगा, एक मुलगी, स्नुषा, जावई व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चिंचाळा येथील ७० वर्षीय वृद्धाने घेतला विषाचा घोट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 28, 2023
Rating: