सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथील ओमराज सूर्यभान राजूरकर (45) हा 24 डिसेंबर रोजी रविवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास तो घरून निघुन गेला होता. त्याचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचे समजते. याबाबत समाजमाध्यमावर वार्ता फिरत होती. त्याचा सर्वत्र शोधाशोध सुरु होता. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. आज गुरुवार (ता.28) ला ओमराज यांचा मृतदेह करणवाडी शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत निदर्शनास आला. सतत वाढत्या आत्महत्येने मारेगाव तालुका हादरला असून चिंता व्यक्त होत आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.
करणवाडी शिवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 28, 2023
Rating: