दहावी, बारावी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर; "इथून" करा डाउनलोड..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे.
लेखी परीक्षा कधीपासून सुरु होणार? 
बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या दरम्यान पार पडणार आहे.

दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या दरम्यान पार पडणार आहे.

प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा कधीपासून सुरु होणार?
बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 फेब्रुवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 या दरम्यान पार पडणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या दरम्यान पार पडणार आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे दहावी-बारावीच्या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर आज (02 नोव्हेंबर 2023) ला उपलब्ध होणार आहे.


दहावी, बारावी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर; "इथून" करा डाउनलोड..! दहावी, बारावी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर; "इथून" करा डाउनलोड..! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 02, 2023 Rating: 5
Powered by Blogger.