सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यात खेडा कापूस खरेदीला पहाटे कोंबडा आरवल्यापासून शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावात घेण्याची स्पर्धा काही अवैध व्यापाऱ्यांकडून गावाखेड्यात सुरू झाली, ही खेडा खरेदी तत्काळ बंद करून त्यांच्यावर कारवाई करा,अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने एपीएमसी (APMC) व पोलीस स्टेशन ला देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष चांद बहादे, आकाश खामनकार, गजानन चंदनखेडे, ईशान दारुंडे, जमीर सय्यद, यांची उपस्थिती होती.
आत्महत्याग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्यता व्यवसाय शेती हा असून येथील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित शेतातील उत्पन्नावर अवलंबून असते. आधीच अतिवृष्टी व नापिकीने तालुक्यातील शेतकरी कमालीचा मेटाकुटीस आला आहे. सध्या कापसाला भाव नसल्याने जगाचा पोशिंदा पूरता बेजार झाला असून, बळीराजा च्या घरात साठवून ठेवलेल्या मालावर अवैध खेडा खरेदीदरांची करडी नजर असल्याने भल्या पहाटे पासून आपले वाहणे नेवून तोकड्या भावात कापूस खरेदीला मोठे उधाण आले आहे. मात्र, यावर नियंत्रण ठेवणारे कृषी उत्पन्न बाजार समिती व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करित असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. असा आरोप मनसे शहराध्यक्ष चांद बहादे यांनी निवेदनातून केला आहे.
दरम्यान, मारेगांव शहर, मार्डी, कुंभा, नवरगांव, वेगांव, वनोजादेवी, शिवनाळा, पेंढरी, बोटोणी, अर्जुणी, भालेवाडी, सालेभट्टी, कोलगाव, डोर्ली या सह तालुक्यातील अनेक गावात अवैध खेडा कापूस खरेदीदारांची त्यांच्या वाहानासह दररोज झुबंड असुन विविध प्रलोभनाच्या आधारे शेतकऱ्यांचा कापुस या नगदी पिकांची आर्थिक लुट सुरु असून हा सर्व प्रकार खुलेआम राजरोजपणे सुरू असल्याचे असे निवेदनात नमूद आहे.
त्यामुळे मारेगांव शहरासह तालुक्यातील अवैध खेडा कापूस खरेदीदारांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या संदर्भात तिव्र आंदोलन करू असा ईशारा देण्यात आला आहे.
अवैध खेडा कापूस खरेदीला मारेगाव तालुक्यात उधाण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 01, 2023
Rating: