सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
विदर्भातील सप्त खांजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या नंतर राज्यात प्रसिद्ध असलेले इंदुरीकर महाराज यांच्या विनोदी आणि परखड कीर्तनाची संधी वणीकरांना लाभणार होती. किंबहुना त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था द्वारा आयोजित करण्यात आला होता. मात्र, राज्यभर मराठा आंदोलनाची धग वाढत असल्याने पुढील पाच दिवस मी कुठेही कीर्तनाचा कार्यक्रम करणार नाही, असे सांगुन महाराजांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला होता.
दरम्यान, इंदुरीकर यांनी कुठेही कीर्तनाचे कार्यक्रम करू नये, अशा सुचना जिल्हाधिकारी यांचेकडूनही त्यांना प्राप्त झाल्याने अखेर वणी येथील आयोजित कार्यक्रमाला मी येऊ शकणार नाही, असे त्यांनी आयोजकांना कळविताच वणीकरांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. त्यांच्या आगमनाची तालुक्यातील जनता मोठ्या आतुरतेने वाट पाहत होती, परंतु काही कारणास्तव कार्यक्रम रद्द झाल्याने शुक्रवार ला वणी येथे होणारा कार्यक्रम तूर्तास स्थगीत करण्यात आला असून पुढील तारीख दिल्यानंतरच हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रा. टिकाराम कोंगरे यांनी माध्यमातून दिली.
परवा ला वणीत होणाऱ्या इंदूरीकर महाराजांचे कीर्तन स्थगित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 01, 2023
Rating: