सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आमदारांच्या सहकार्याने शहरात जातीय दंगल घडविण्याचे आणण्याचा कट कारस्थान करणाऱ्यावर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन ठाणेदार खंडेराव यांना दि.31 ऑक्टोबर रोजी देण्यात आले.
मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून शांतप्रिय तालुका म्हणून तालुक्याची ओळख आहे. मात्र, तालुक्यात गेल्या काही दिवसापासून शहराचे वातावरण कलुषित करण्याचे षडयंत्र गैरअर्जदारांच्या काही कार्यकर्ते करण्याचा प्रयत्न करित असून आमदाराच्या मर्जीने शहरात एका नगरसेवकाकडून अवैध मटका धंदा चालवीत असल्याचे दिसते. त्या मटक्याच्या धंद्यात आमदाराचा सहभाग असल्याचे दिसते. एवढे असुनही मारेगांव शहर शांतता राखत असतांना बेजबाबदार आमदारांनी एका मटका व्यवसाय करणाऱ्या नगरसेवकाचे सांगण्यावरुन गैरअर्जदार आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रवि बेलुरकर व त्यांचे काही साथीदारांनी दिनांक ०३/१०/२०२३ रोजी व दि. २७, २८/१०/२०२३ रोजी दुपारच्या वेळेस मारेगांव शहरात जातीय दंगल घडविण्याचे कटकारस्थान केले व आजही करित आहे.
मारेगांव शहरातील नागरीकांच्या तथा महीलांच्या भावना दुखावल्या जात आहे. एवढेच नसुन सर्व समाजातील जनतेच्या भावनांशी खेळ करित असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून केला आहे. त्यामुळे आमदार व त्यांच्या इतर भाजप कार्यकर्त्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून दिलेल्या निवेदनावर विजय कांबळे युवा आघाडी ता. अध्यक्ष, राहुल भेंडारे ओबीसी क्रांति दल अध्यक्ष, खुशाल येरगुडे, अनिल कुमरे, पांडुरंग देवाळकर, रवि घुमे, धनराज मून, संजय पाटील, यांच्या सह्या आहेत तर वंचित चे ता. अध्यक्ष गौतम दारुंडे, ता. उपाध्यक्ष संजय जिवने, नूतनताई तेलंग महिला अध्यक्ष, गंगाधर महाराज लोणसावले, वासू वनकर आदींची उपस्थिती होती.
शहरात जातीय दंगली घडवून आणण्याचा कटकरस्थान करणाऱ्यावर कारवाई करा - वंचितची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 01, 2023
Rating: