सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : "शब्दाने सहानुभूती मिळवणे सोपे असते. परंतु कर्तुत्वाने मदत करणे हे कठीण काम आहे". अशी आपल्याकडे एक म्हण आहे. मात्र,ती म्हण अंगीकारून हे कठीण कार्य जनहित कल्याण संघटनेने करून दाखवत तालुक्यातील मार्डी परीसरातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्याचं सौदार्य केले आहे.
तालुक्यातील केगांव येथील अनिकेत पिंपळशेडे या सतरा वर्षीय विद्यार्थ्याचा आटोने प्रवास करताना अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली होती,तर सर्वत्र तालुक्यामध्ये तीव्र पडसादही उमटले होते. दरम्यान, ही सद्यस्थिती लक्षात घेऊन जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या पुढाकारातून, उपाध्यक्ष रॉयल सय्यद, सचिव निलेश तेलंग व समीर कुळमेथे यांनी वणी आगार प्रमुखांची भेट घेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मार्डी ते मारेगाव प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना सोमवार दि.30 ऑक्टोबर पासून पुढील 10 दिवस दिवाळी सुट्या पर्यंत मोफत खासगी बस सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे दिवस सुरु असल्यामुळे व ज्ञानार्जनात विद्यार्थी मागे पडू नये,यासाठी संघटनेचा हा निर्णय व कार्य अभिनंदनासह कौतुकास पात्र असल्याचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले. तूर्तास त्यांच्या उदात्त भावनेला नागरिक सुद्धा सलाम करित मारेगाव-मार्डी या डामडौल रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने हाताळण्याचीही आग्रही मागणी होत आहे.
बस सेवा याप्रमाणे उपलब्ध आहेत...
मार्डी ते मारेगाव सकाळी 7 वाजता. (पहिला राउंड)
मार्डी ते मारेगाव सकाळी 10 वाजता. (दुसरा राउंड)
मारेगाव ते मार्डी दुपारी 1 वाजता. (परतीचा प्रवास)
मारेगाव ते मार्डी दुपारी 3 वाजता. (परतीचा प्रवास)
...याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्डी ते मारेगाव मोफत बस प्रवास करता येणार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 31, 2023
Rating: