सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे
वरोरा : तालुक्यातील खांबाडा परीसरात विजेचा लंपडाव सुरुच आहे. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने हा लंपडाव तात्काळ थांबवावा. तसेच खांबाडा परीसरातील म.रा.वि.वि. कंपनीच्या संबंधात असलेल्या सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या समस्या ताबडतोब निकाली काढा, अन्यथा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना स्टाईलने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी दिला आहे. उपरोक्त मागणीचे निवेदन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या संयोजनात उप-तालुका प्रमुख सुधाकर बुराण यांच्या नेतृत्वात खांबाडा उपविभागातील म.रा.वि.वि. कंपनीचे कनिष्ठ अभियंत्या यांना नुकतेच दिले आहे.
सदर निवेदनात असे नमुद केले आहे की, सध्या पावसाळा संपत असल्यामुळे पिकांना पाणी द्यावे लागत आहे. पाण्याअभावी शेत पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परंतु विद्युत विभागामार्फत थ्री फेज पुरवठा हा रात्री करीत असल्यामुळे शेत पिकांना ओलीत करणे कठीण जात आहे. त्यामुळे आठवडाभर दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा. शेत पिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बंद असलेल्या नादुरुस्ती कनेक्शनची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. पावसाळ्यात अतिरिक्त पावसामुळे शेत शिवारातील वाकलेले विद्युत पोल आणि पडलेले विद्युत पोल यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. सदर पोल ताबडतोब सुरळीत करण्यात यावे.
बोपापुर येथील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा नेहमीच खंडीत होत असतो. या ट्रान्सफॉर्मर वरील डी.ओ. नेहमी पडत आहे. याचा परिणाम म्हणून या परीसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असते. या समस्येवर संबंधीत विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी. पावसाळा संपल्यानंतर विद्युत विभागामार्फत विद्युत वायरवर आलेल्या झाडांची कटाई करावी. परंतु खांबाडा विभागात बऱ्याच ठिकाणी विद्युत वायर झाडाला स्पर्श करून असल्याचे दिसून येते. यामुळे येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असतो.ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतात विद्युत पुरवठा होण्यासाठी ए.जी. कनेक्शन डिमांड भरले आहे. त्या सर्व शेतकरी बांधवांना तसेच घरगुती विद्युत पुरवठा अर्ज केलेल्या नागरिकांना ताबडतोब विद्युत कनेक्शन पुरवण्यात यावे
सदर निवेदन देत असताना उप-तालुका प्रमुख सुधाकर बुराण, विभागीय समन्वय प्रमुख प्रमोद वाघ, शिवसेना विभाग संघटक नितीन मायकरकार, शिवसेना विभाग प्रमुख विनोद लोहकरे, शिवसेना विभाग समन्वयक अंकुश थाटे, सागर धोटे ,अरुण धोटे, बंडू धोटे, प्रमोद चौधरी, आकाश जोगी, प्रमोद पाकमोडे, मारुती धोटे, पवन धोटे, संजय धोटे, गजानन तेजने, देविदास किनेकर, नानाजी गुडघाने, अरविंद ठाकरे, आशिष गोहणे, मोरेश्वर ठाकरे, विकास कोसरे, प्रशांत मेश्राम, शिवाजी पंधरे, नामदेव सोयाम, ऋतिक आत्राम, संतोष आडकिने, रवींद्र बुराण, खुशाल लडके आणि विठ्ठल बारेकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
खांबडा परिसरात विजेचा लंपडाव सुरूच : जनता त्रस्त
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 18, 2023
Rating: