युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या केळापूर तालुका अध्यक्षपदी रवि वल्लमवार तर सचिवपदी सतोष सिंह सेगर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार व यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत मडावी यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्हा शहर अध्यक्ष व दैनिक मराठी मातीचे मुख्य संपादक आत्मारामजी मडावी, महाराष्ट्र ग्रामीण न्युजचे मुख्य संपादक विनोद कनाके, शुभम बावणे व महीला आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जयश्री बापुराव गुरमवार,केळापूर तालुका अध्यक्ष निता नंदकुमार पुल्लजवार यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी बैठक दिं.18 ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह पांढरकवडा येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघ केळापूर तालुका कार्यकारणीची निवड जाहिर करून अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी रवि वल्लमवार यांना युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या केळापूर तालुका अध्यक्षपदी तर सचिवपदी संतोष सिंह सेंगर व प्रफुल नांन्ने तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आले. तसेच शहर अध्यक्ष सागर व्यास, तालुका सहसचिव गणेश बेतवार, करंजी ग्रामीण अध्यक्ष पदी सागर मुळे, युवा आघाडी शहर अध्यक्ष तनवीर शेख, यांचा सत्कार करून युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

या प्रसंगी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी तालुका केळापुर कार्यकारिणी करून पत्रकारांवर कुठल्याही परिस्थितीत वेळ प्रसंगी अन्याय होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. संघ पत्रकारांच्या पाठिशी कायम उभा राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव्य प्रयत्नशील राहिल असे, यावेळी मत व्यक्त केले. तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची सध्या अतिशय वेगाने कार्यकारणी निवड जोर धरत आहे, कारण पत्रकारावर वारंवार होणारे जीव घेणे हल्ले राजकीय दबाव त्यामुळे चौथा आधारस्तंभाचे निस्वार्थी व निर्भिड पत्रकार हे ठेकेदाराचे अफरातफर केलेले काम बातमीद्वारे जनतेसमोर मांडले जाते. तेव्हा राजकीय दबाव येतो त्यामुळे संघटन अंत्यत महत्वाचे ठरते असे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी सांगितले.
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या केळापूर तालुका अध्यक्षपदी रवि वल्लमवार तर सचिवपदी सतोष सिंह सेगर युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या केळापूर तालुका अध्यक्षपदी रवि वल्लमवार तर सचिवपदी सतोष सिंह सेगर Reviewed by सह्याद्री चौफेर on October 18, 2023 Rating: 5
Powered by Blogger.