सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मात्र, घटनेनंतर असे काहीच घडले नाही, अशी घुमजावची भाषा करित आपली भूमिका सरपंच तथा तिचा पती व अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी बदलली होती. या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य संतोष टेमर्डे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कडे दि.१९ सप्टेंबर २०२२ ला तक्रार सह निवेदन सादर केले होते. चौकशीनुसार विभागीय आयुक्तांनी त्या महिला सरपंचांना अपात्र ठरविले. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याने या मारहाणीचा पर्दाफास झाला.
तालुक्यातील पुनवट ग्रामपंचायतीत दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी मासिक सभा आयोजित करण्यात आली असताना या मासिक सभेत गावातील समस्याबाबत पाच ग्रामपंचायत सदस्यांनी महिला सरपंचांना चांगलेच धारेवर धरले. त्यावर निरुत्तर झालेल्या माहिला सरपंचाने थेट संपर्क साधत पतीराजाला मिटिंग मध्ये पचारण केले. पतीराजाने सदस्यांना मारहाण करून धमकी दिल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी गट विकास अधिकारी यांच्या मार्फत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
विशेष म्हणजे, त्या मासिक सभेच्या वेळी ७ सदस्य उपस्थित होते, तर काही सदस्य निघून गेले होते. चौकशी दरम्यान काही ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेच्या वेळी अशी काही घटना घडलीच नाही, असे बयाण नोंदविले. मात्र, ग्रामपंचायतीत लावण्यात आलेला तिसरा डोळा म्हणजे सिसिटीव्ही. या सिसि टीव्ही कॅमेऱ्यात घडलेला प्रकार कैद झाला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा भांडाफोड झाला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९ (१) तरतूदी नुसार त्यांना सदस्य तथा सरपंच ग्रामपंचायत पूनवट या पदाकरीता अपात्र घोषित केल्याचा आदेश १२ सप्टेंबर २०२३ ला काढण्यात आला. त्यात कर्तव्यात कसूर व गैरवर्तणूक स्पष्ट झाल्याने महिला सरपंच पौर्णिमा संदीप राजुरकर ह्या अपात्र ठरल्याने वणी उपविभागात एकच खळबळ उडाली आहे.
पतीच्या हस्तक्षेपाने अखेर "त्या" महिला सरपंच ठरल्या अपात्र...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 18, 2023
Rating: