सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : यवतमाळ जिल्हा पोलीस व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या सहकार्यातून "नशा मुक्त पहाट" व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम दि. 17 ऑक्टोंबर रोजी क.वा.मवि.मारेगाव येथे आयोजित करण्यात आला.
डॉ.पवन बनसोड जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ यांच्या संकल्पनेतून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र व मारेगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती अभियान अंतर्गत "नशा मुक्त पहाट सशक्त यवतमाळ नारा, व्यसनाला देऊ नका थारा" हे ब्रीद घेऊन मारेगाव येथे अभीर देसाई मुक्तांगण येथील समूपदेशक व ठाणेदार जनार्धन खंडेराव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान,अबीर देसाई यांनी मुक्तांगण स्थापनेबाबत भूमिका विषद केली. तसेच अल्कोहोल, तंबाखू, ड्रग्स, इंटरनेट अती वापराचे व्यसन व इतर व्यसनावर उपचार तसेच साध्या सोप्या पद्धतीने करावयाच्या उपचार पद्धती वर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस कर्मचारी सह विविध मान्यवर तथा राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रमुख व विद्यार्थी सहभागी झाले होते.
मारेगाव येथे 'नशा मुक्त पहाट'च्या माध्यमातून जनजागृती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 18, 2023
Rating: