सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : यवतमाळ जिल्ह्यात नवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. वणीतही त्याची धूम पहावयास मिळते. शिव आनंद व रॉयल फाऊंडेशन, तसेच पोलीस स्टेशन वणी च्या संयुक्त विद्यमाने लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, आदी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके वणीच्या 13 प्रभागातील दुर्गा मंडळाच्या प्रांगणात 72 चिमुरड्यांची चमु दाखविणार असून याचे नेतृत्व अवघ्या 10 व्या वर्गातील विद्यार्थिनी व प्रशिक्षक तेजस्विनी राजु गव्हाणे करणार आहे.
प्रत्येक महिला व पुरुषात बचावाचे असे काही मर्दानी गुण असणे काळाची गरज असुन आजच्या आधुनिक युगात असे मर्दानी खेळ लुप्त होत चाललेआहे. शिव आनंद व रॉयल फाऊंडेशन, तथा पोलीस स्टेशन वणीच्या च्या संयुक्त विद्यमाने शहरातील 13 प्रभागात दुर्गा मंडळांच्या प्रांगणात हे मर्दानी खेळ होत असून बघ्यांची मोठी गर्दी यावेळी जमलेली पाहायला मिळत आहे. यातुन महिला सक्षम झाली पाहिजे, पुढची महिला ही सुदृढ व सक्षम असली पाहिजे, तिला संघर्षाशी लढता आले पाहिजे हा एकमेव उद्देश असुन, दरम्यान अंगीकृत असलेले हे मर्दानी खेळ पाहता अधुनिकतेकडे वळणारे त्याकडे पाठ फिरवीत हे गुण घ्यायचा प्रयत्न करीत आहे. गेल्या काही काळात मर्दानी खेळाचे प्रशिक्षण विशेष म्हणजे हे प्रशिक्षण एक महिला चिमुकली अवघ्या 10 व्या वर्गात शिकत असलेली कु. तेजस्वीनी गव्हाणे प्रशिक्षण देत आहे, रोज या प्रशिक्षणात 80 ते 90 विद्यार्थी स्वसंरक्षणाचे धडे गिरवत आहे. संध्याकाळी 5.30 ते 7.30 या कालावधीत हे प्रशिक्षण होत आहे.
वणी तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राजु गव्हाणे यांची मुलगी तेजस्वीनीला बालपणापासूनच साहसिक खेळाची आवड आहे. तिने स्वतः घेतलेले गुण दुसऱ्या मुला-मुलींना ती देत असुन त्यामुळे शरीर सुदृढ व मर्दानी डाव अंगीकृत असते, यातून बऱ्याच प्रमाणात विद्यार्थी तिच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. तेजस्विनीला लाठीकाठीसह तलवारबाजी, दांडपट्टा, बाना, भालाफेक आदी साहसिक खेळात निपून आहे. याशिवाय कराटे या खेळातही ती ब्लू बेल्ट आहे. विविध साहसिक खेळासह ती वकृत्व, इतर कला व सामाजिक कार्यतही ती अग्रेसर असते. 72 चिमुरड्यांची चमु चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत असुन तरी सर्वांनी ही प्रात्यक्षिके एकदा नक्की पहावी आणि चिमुरड्यांचा उत्साह द्विगुणित करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वणीच्या 13 प्रभागात नवरात्रीच्या दहा दिवस होणार चित्तथरारक प्रात्यक्षिके....
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 18, 2023
Rating: