सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) *फेब्रुवारी आणि मार्चमध्ये* इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षा घेणार आहे. तुम्हीही या परीक्षेला बसणार असाल, तर तुम्ही महाराष्ट्र बोर्ड 10वी आणि 12वीची वेळा पत्रक 2024 येथे चेक शकता.
कधी होणार 12वी व 10वीची परीक्षा
महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीची म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 19 मार्चपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार आहे.
कधी मिळणार हॉल तिकिट
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. मात्र, यासंदर्भात सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही. लक्षात ठेवा की प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
असे करा टाईम टेबल डाऊनलोड..
▪️महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
▪️त्यानंतर 10वी आणि 12वी वेळापत्रक 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
▪️आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
▪️विद्यार्थी ही PDF चेक करू शकतात आणि डाउनलोड करू शकतात.
उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण लागणार?
महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण मिळवणे बंधनकारक असेल. मात्र, यापेक्षा कमी गुण मिळाल्यास त्यांना पुर्नपरीक्षेला बसण्याची संधी मिळेल. महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2024 शी संबंधित लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही बोर्डाची अधिकृत वेबसाइट देखील पाहू शकता.
12 वीची परीक्षा फेब्रुवारीत तर 10 वीची मार्चमध्ये, जाणून घ्या कधी मिळणार हॉल तिकिट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 17, 2023
Rating: