बोर्डा येथील शेतकरी पुत्राची विष प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना, सतत आत्महत्याची मालिका सुरूच असून पुन्हा एका बोर्डा येथील अंदाजे 44 वर्षाच्या शेतकरी पुत्राने दिनांक 16/10/2023 च्या मध्यरात्री वेगाव रोडलगतच्या गट क्र.179 या शेतामध्ये विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. सदर घटनेने बोर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृतक आनंद मनोहर नागरकर तो शेतात पडून असल्याचे सकाळी आज दिनांक 17/10/2023 रोजी वडील मनोहर नागो नागरकर यांनी बघितले असता आनंद हा मृतावस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ गावामधील लोकांनी त्यांचा मृतदेह शासकीय ग्रामीण रुग्णालय वणी मध्ये शवविच्छेदनाकरिता आणला असून त्याच्या आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून मृतकाचे पश्चात पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करित.

तालुक्यात दरदिवसागणिक कुठे ना कुठे आत्महत्याच्या घटना समोर येत असल्यामुळे समाजमन सुन्न झाला आहे. याबाबत चिंता ही व्यक्त होत आहे. 



बोर्डा येथील शेतकरी पुत्राची विष प्राशन करून आत्महत्या बोर्डा येथील शेतकरी पुत्राची विष प्राशन करून आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on October 17, 2023 Rating: 5
Powered by Blogger.