निशा कांबळेच्या आजारपणात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून आले


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : तालुक्यातील सोईट (नविन) येथील निशा कांबळे (१२) ही मुलगी मागील काही दिवसांपासून आजारी आहे. सामाजिक बांधिलकीतून सहकार्य करीत निशा कांबळेच्या आजारपणात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून आले. शिंदे यांनी स्वखर्चातून ऑक्सीजन मशीन उपलब्ध करुन निशाला जगण्याची नवी उमेद दिली.  
सोईट (नविन) येथील कांबळे कुटूंबांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. यामुळे निशाच्या उपचारात असंख्य अडचणी निर्माण होत आहे. तिच्या आजारपणात ऑक्सीजन मशीनची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. निशाचे पालक तिच्या आजाराने फारच दुःखी झाले. रविंद्र शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी लेकीच्या आजाराची करून कहानी कथन करुन मदतीची अपेक्षा व्यक्त केली. रविंद्र शिंदे यांनी कुठलाही विलंब न करता तत्काळ निशाच्या आजारपणात ऑक्सीजन मशीन उपलब्ध करून दिली. तसेच अधीक मदतीचे आश्वासन सुध्दा दिले.निशाच्या आजारपणात निस्वार्थी वृत्तीने मदत केल्याबद्दल निशाच्या पालकांनी रविंद्र शिंदे यांच्या प्रति कृत्यज्ञता व्यक्त केली.

जनसेवेत सदैव तत्पर : गरजूंनी संपर्क साधावा
रोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात आम्ही जनसेवेत सदैव तत्पर आहोत. गरजूंनी आरोग्य विषयक मदतीसाठी संपर्क साधावा. असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधान सभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.
निशा कांबळेच्या आजारपणात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून आले निशा कांबळेच्या आजारपणात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून आले Reviewed by सह्याद्री चौफेर on September 29, 2023 Rating: 5
Powered by Blogger.