सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
सिध्दार्थ मरकवाडे (30) रा. भीमनगर ता. वणी असे, मृतक युवकाचे नाव आहे. सिध्दार्थ हा एका बॅन्ड पथकात बॅन्ड वाजविण्यासाठी चंद्रपूर येथे गेला होता. बॅन्ड वाजवित असताना अचानक त्याला भोवळ आली व तो निपचित खाली कोसळला असता त्याच्या सहकाऱ्यांनी तत्काळ त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले.
सिध्दार्थ हा होतकरू युवक होता. तो फोटोग्राफी व्यवसाया सोबतच वणी नगरपरिषदेच्या घंटागाडी वर चालक म्हणून सुध्दा कार्य करीत होता. सिद्धार्थ याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
विसर्जनाकरिता गेलेल्या होतकरू युवकाचा मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 29, 2023
Rating:
