सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : शहरातील केशव नागरी सहकारी पतसंस्थेची स्वमालकीचे मुख्य कार्यालय "केशवस्मृती" या नवीन मुख्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण मोठ्या थाटात संपन्न झाले. यावेळी मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग अध्यक्ष माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, रा. स्व. संघांचे अखिल भारतीय प्रमुख सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, चंद्रशेखर खोंड आदी मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक चंद्रशेखर खोंड यांनी केली,सर्व सामान्य घटकापर्यंत पोहचण्याचं त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हणाले, यावेळी शाखा विस्तार करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. ते आपल्या प्रास्ताविकेतून बोलताना सामाजिक हित जोपसणारी संस्था असल्याचे सांगितलं.
प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भाष्य केले, या प्रसंगी बोलताना पतसंस्थाना प्रशिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. लोकांचा विश्वास अधिकाधिक वाढत असल्याचेही ते म्हणाले. हंसराज अहिर यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. आपल्या भाषणात त्यांनी संस्थेचे भरभरून कौतुक केले, सुनील देशपांडे हे प्रकल्प पुरुष आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले. आमदार मदन येरावार यांचा निरोप वाचून दाखवण्यात आला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी संस्थेच्या कार्याचे अथोचित कौतुक केले, शेतकरी, युवक, बेरोजगार, व्यावसायिक यांना संस्थेकडून कशा पद्धतीने आर्थिक मदत मिळते तेही सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रात कार्य करण्याऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बचतीचे महत्व कळावे म्हणून विद्यार्थ्यांना गुल्लफ वाटप करण्यात आले. सुनील देशपांडे यांनी भगवान बुद्धांच्या विचार आपल्या भाषणातून मांडले, त्यांच्या अष्टांगिक मार्गांवर सविस्तर असे विवेचन केले.हे अष्टांगिक मार्ग व्यक्तिगत तथा संस्थात्मक क्षेत्रात कसे महत्वाचे आहे त्यावर मोलाचे मार्गदर्शन केले. दीकुंडवार यांनी सर्वांचे आभार मानले, रेणुका अणे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, संस्थेचे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी या लोकार्पण सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'केशवस्मृती' नवीन मुख्यालयाचे लोकार्पण थाटात संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 29, 2023
Rating:
