सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार आज (गुरुवारी) रात्री वणी-मारेगाव महामार्गावर भीषण स्वरूपाचा विचित्र अपघात झाला. या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस जखमी असल्याची माहिती आहे. मात्र, कॅबिन मध्ये फसलेल्या महिलेला बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून हमसफर ट्रॅव्हलची ट्रकला मागून भिडल्याचे समजते.
वणी -यवतमाळ महामार्गावर आज रात्री 9.15 च्या सुमारास यवतमाळ हून वणीकडे ट्रॅव्हल क्र.एम एच 27 ए 9994 हे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने उभ्या असलेल्या ट्रक ला मागून धडक दिल्याचे समजते, त्यामुळे हा भीषण अपघात झाला. ही घटना राज्य महामार्गांवरील गौराळा फाट्यावर 9.15 ला घडली असून या अपघातातील अपघात ग्रस्ताना बाहेर काढण्याचे काम सुरु असून अपघात स्थळी ऍम्ब्युलन्स, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते यांचे मदत कार्य सुरु आहेत.
सदर ट्रॅव्हल्स यवतमाळहून चंद्रपूर कडे देव दर्शनला जाणाऱ्या या खासगी ट्रॅव्हल्स मध्ये अंदाजे सत्तर प्रवाशी असल्याचे कळते. मात्र,या भीषण अपघातातील मृतक संख्या अजूनही कळू शकली नाही. परंतु जखमीमध्ये वीस ते पंचवीस प्रवाशी असून काही सुखरूप तर ट्रॅव्हल्स मध्ये फसलेल्यांना महिलेला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, घटना स्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली.
वणी-मारेगाव महामार्गावर भीषण अपघात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 28, 2023
Rating:
