सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यासाठी मारेगावात होणाऱ्या आंदोलनात तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या सर्व आदिवासी बांधवानी लाखों च्या संख्येने सहभागी व्हावे असे, आवाहन आदिवासी बचाव कृती समिती च्या वतीने करण्यात आले आहे.
येत्या दि.3 ऑक्टोबर 2023 रोज मंगळवारला स्थानिक नगर पंचायत, कार्यालय मारेगाव येथे सकाळी 10 वाजता तालुक्यातील सर्व पक्षीय आदिवासी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने आज करण्यात आले आहे.
अनुसूचित जमातीच्या (ST) आरक्षणाला धक्का लागल्यास सर्व समाज बांधव त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, हक्कासाठी धक्का दिला जाईल. असा सरकारला सूचक ईशारा या आक्रोश मोर्चातून दिला जाणार आहे.
सर्व आदिवासी बांधवाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात आदिवासी भागात आपापल्या परीने रस्त्यावर उतरून,आक्रोश मोर्चाचे आयोजन करून सरकारचा निषेध करावा. मिंधे सरकारला आदिवासीनी आदिवासिंच्या विरोधात असणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.- गीत घोषप्रगतशील विचारवंत तथा अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष
आरक्षण बचावासाठी निघणार मारेगावात आक्रोश मोर्चा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 28, 2023
Rating:
