सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मात्र हल्ली, या सोशल मिडियाचा वापर आगपाखड, टिका टिपणी करणे आणि राजकारण ह्यातच वेळ घातला जात असल्याचे काहींचे मत आहे. "नुसतं राजकारण करू नका सरकारची वाटचाल बदलली, सरकार कोणचेही असो जनतेच्या, व शेतकऱ्याच्या हिताचं असल पाहिजे. नुसते टिका टीपणी करून जमणार नाही, ह्यातच वेळ निघून गेल्यावर पुढे आपण आपल्या पिढीला काय उत्तर द्याल! असे मत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी मारेगाव तहसील कार्यालयाला सोयाबीन वर आलेल्या रोग संदर्भात निवेदन देताना 'सह्याद्री चौफेर' ला संवाद साधताना म्हणाले. पुढे असेही ते सांगतात की, सरकार म्हणजे जनता होय,यास वेळीस लगाम नाही लावला तर देशातल्या गरीब जनतेला जगणं मुश्किल होईल म्हणून टिका टिपणी बाजूला सारून सर्व एक व्हा, असे आवाहन सोशल माध्यमातून गौरकार यांनी केले.
मारोती गौरकार हे शेतकरी शेतमजूरासाठी संघर्षाची वाटचाल करणारे नेतृत्व मारेगाव तालुक्यात एकमेव करताना दिसून येत. कष्ट करणार्या जनतेच्या प्रत्येक लढ्यात गौरकार हे अग्रेसर असतात. त्यांच्या संघर्षातूनच अतिवृष्टी, पीकविमा, गरजूना किट वाटपाचा आग्रह या समाज हिताच्या उपाययोजना शासन दरबारी लावून धरतात. रस्त्यावरच्या लढाई लढणारा अत्यंत शांतप्रिय व आग्रही असणारं मारेगाव तालुक्यातील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
निवेदनातून सोयाबीन पिकांवर आलेल्या पिवळ्या मोझॅक रोगाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अती पावसामुळे कपाशीचे सुद्धा नुकसान झाले आहे, त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई तत्काळ द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत चा बाजार समितीने ठराव सुद्धा घेतला असून तो तहसीलदार यांना सादर केल्याचे निवेदनात नमूद केले आहे, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारची वाटचाल बदलली, वेळीच ओळखा - मारोती गौरकार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2023
Rating:
