टॉप बातम्या

महाडोळी ते शेगाव नाल्यावरील खड्डे बुजवा


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा :  महाडोळी ते शेगाव नाल्यावरील खड्डे बुजविण्यात यावे तथा महाडोळी ते चिकणी नाल्यावर पाईप वाढविण्यात यावे, या मागणीला घेवून शिवसेना (ऊबाठा) तर्फे आज (ता.९) ला बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. 
सरपंच तथा युवती जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर यांच्या नेतृत्वाखाली युवती युवासेना शिष्टमंडळाने सदर निवेदन दिले. 
सदर महाडोळी ते शेगाव रस्त्यावरील नाल्यावर पुलावरून माणूस वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. थोड्याश्या पावसात नाला बंद होते. त्यामुळे तात्काळ काम करावे अशी मागणी करण्यात आली आहे. महाडोळी ते चिकणी नाल्यावर अपुरा पाईप असल्यामुळे अडचण होत आहे, म्हणून पाईप वाढविणे आवश्यक आहे.
यावेळी आश्लेषा जिवतोडे भोयर जिल्हा समन्वयक, तेजस्विनी चंदनखेडे शहर युवती अधिकारी, स्नेहा कीन्नाके उपशहर समन्वयक, अभिजित कुडे उपस्थित होते.
Previous Post Next Post