सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : श्रीहरी पार्वती स्मृती प्रित्यर्थ,सह्याद्री चौफेर मिडिया प्लॅटफॉर्म च्या विद्यमाने सुगम संगीताचा बहारदार कार्यक्रम श्रीराम कुमरे यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानी करण्यात आला.
श्रावण सोमवार महिना सुरु आहे. सर्वत्र भक्ती मय वातावरण आहे. विशेष म्हणजे आयुष्य जगण्यासाठी आई वडिलांनी दिलेलं, अँडव्हान्स पाठबळ असतं. तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या एक त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं. "मातृ देवो भव"अन् "पितृ देवो भव" असे म्हणलेलं आहे. हेच कुमरे दांपत्य आपल्या जन्मदात्या आईवडील श्रीहरी पार्वती स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी भजन,सुगम संगीताचे माध्यमातून खरी श्रद्धांजली ते वाहतात. यावर्षी सुद्धा सुगम संगीत बहारदार कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी श्रीराम कुमरे म्हणाले, खरं तर आईबाबा हे दोनच असे आहेत ह्या विश्वावर ज्यांची जागा कोणी नाही घेऊ शकत नाही.
या प्रसंगी सुगम संगीत कार्यक्रमला लाभलेले मारेगाव येथील जेष्ठ प्रसिद्ध भजन गायक विठ्ठलराव गेडाम, गायक अभिजित पंढरपूरे, गायक सुमित ठमके, गायक कुंदन गौरकार, गायक आकाश कुमरे, गायक सचिन पेंदोर, तबला वादक रोशन चांदेकर (पाटाळा), हार्मोनियम प्रशांत ठाकूर (नवरगाव), तर साथ संगत कुमार अमोल कुमरे, सुरज तोडसाम, विशाल मेश्राम आदींची लाभली. हा संगीतमय कार्यक्रमाला स्थानिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला.
श्रीहरी पार्वती स्मृती प्रित्यर्थ सुगम संगीत व भजन संध्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 10, 2023
Rating:
