फक्त एक दिवस बाकी, वणी शहरात प्रथमच मनसे दहीहंडी आणि मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळींची उपस्थिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मनसे दहीहंडी उत्सवाला आता फक्त एक दिवस उरला असून, या दहीहंडी थराराची वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. संपूर्ण राज्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त दहिहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून मनसेच्या वतीने वणी शहरात प्रथमच दि.11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपासून शासकीय मैदान पाण्याची टाकी जवळ 'मनसे दहिहंडी उत्सव' थेट नागरिकांना पहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी (मुंबई) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या दहिहंडी उत्सवासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. अशी माहिती आयोजक मनसे नेते राजू उंबरकर यांनी पत्र परिषदेत दिली.
दहिहंडी उत्सवात मुंबई, परतवाडा, नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, आणि इतर ठिकाणावरून पंधराचे जवळपास गोविंदा पथक वणी येथे दाखल होणार आहेत. 15 टिम चे तीन हजार सदस्य वणी येथे दाखल होणार असून 200 गोविंदांचा सहभाग असलेला संघ 41 फुट उंच दहिहंडी मानवी मनोरा तयार करून 30 सेकंदात दहिहंडी फोडण्याचा थरार जनतेला थेट पहाण्यास मिळणार आहे.
यावेळी कार्यक्रमात अद्यावत साऊंड सिस्टीमचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या उत्सवामध्ये दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना प्रथम बक्षीस 2 लाख 51 हजार रुपये, द्वितीय बक्षिस 1 लाख रुपये, तिसरे बक्षिस 51 हजार रुपये रोख असे देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात महिलांसाठी विशेष बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.तसेच यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने विविध क्रिडा व सांस्कृतिक उपक्रम राबविले जाणार आहेत, असे पक्षनेते उंबरकर यांनी माहिती दिली.
फक्त एक दिवस बाकी, वणी शहरात प्रथमच मनसे दहीहंडी आणि मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळींची उपस्थिती फक्त एक दिवस बाकी, वणी शहरात प्रथमच मनसे दहीहंडी आणि मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळींची उपस्थिती Reviewed by सह्याद्री चौफेर on September 10, 2023 Rating: 5
Powered by Blogger.