सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून हजारो रुपयांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी सध्याची पिढी हजारो रुपये अनर्थ उडवताना दिसत आहे. पण याला अपवाद आहेत. ते अध्यक्ष प्रसाद ढवस यांचा वाढदिवसाच्या अनर्थ खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांना शालेय बॅग व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेसह फोटो व भारत मातेचा फोटो भेट देऊन वाढदिवस साजरा केला. त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कानडा येथील प्रसाद ढवस यांच्या गावातील जि प शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षण क्षेत्रात मदत व्हावी फुल ना फुलाची पाकळी का होईना समजाचे आपण काहितरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून प्रसाद ढवस यांनी शैक्षणिक साहित्य,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेसह फोटो व भारत मातेचा फोटो देऊन विद्यार्थ्यांसमवेत शाळेत वाढदिवस साजरा केला. त्यांच्या सामाजिक कार्याने इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
वाढदिवसाचा अनर्थ खर्च टाळून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत केल्याचा वेगळाच आनंद मिळतो असे प्रसाद ढवस यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्यध्यापक श्री ब्राम्हणे सर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका सौ गिता सुधाकर चवले, मदतनीस सौ सविता झीले, सौ नेहा प्रसाद ढवस, अवंती देठे, जिया ढवस, पवण ढवस, रमेश बदखल, भैयाजी झाडे, देवराव धोबे, पुरूषोत्तम धोबे, अरूण झाडे, पंढरी मेश्राम, प्रसाद झाडे, संदिप बोथले, आनंदराव देठे, घनश्याम ढवस, हरिभाऊ ढवस, श्रीकृष्ण दानव, पुंडलीक राजुरकर, अजित मोहितकर, हर्षद धोबे, तुषार बोथले, रोहीत दर्वेकर, विशाल आवारी, हर्षद मडावी, राहूल मडावी, अक्षय मेश्राम, भडके, गावातील प्रतिष्ठित नागरीक, गुरूदेव सेवा मंडळ कानडा, तथा मित्रमंडळ कानडा आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसाद ढवस यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 10, 2023
Rating:
