सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
राजू पुरुषोत्तम पोटे (47) रा. नवीन लालगुडा असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. अनेक विविध गुन्ह्यात आरोपी असलेला हा सराईत गुन्हेगार मागील चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. पोलिस प्रशासन राजू या सराईत चोरट्याचा मागोवा घेत असतांना तो वाघदरा येथील नदी काठालगत दडून असल्याचा सुगावा गुन्हे शोध पथकाला लागला. गुन्हे शोध पथक ताबडतोब त्याठिकाणी पोहचले. मात्र,पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने त्याठिकाणाहून पोबारा करत असतानाच शोध पथकांनी त्याचा पाठलाग करून वणी शासकीय आयटीआय कॉलेज जवळ त्याला मोठ्या शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला आज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, एपीआय माधव शिंदे, सपोनि सुदाम आसोरे, जमादार विकास धडसे, पोकॉ. शुभम सोनुले, सागर सिडाम, सुनिल नलगंटीवार, मोनेश्वर खंडरे यांनी पार पाडली.
त्याचा पाठलाग करून पोलिसांनी घेतलं अखेर ताब्यात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 10, 2023
Rating:
