सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त "वेलकम टू द जंगल" सिनेमाची खास पद्धतीने घोषणा करण्यात आलीय. या सिनेमाच्या टीझर अनाउंन्समेंट मध्ये असंख्य बॉलिबूड कलाकार दिसत आहेत..
वेलकम 3 ची खास घोषणा
वेलकम-3 म्हणजेच वेलकम टू ग जंगल सिनेमात बॉलिवूड कलाकारांची फौज आहे. अक्षय कुमार, परेश रावल यांच्यासह सुनील शेट्टी, संजय दत्त, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडीस, दिशा पटानी, जॉनी लिव्हर, तुशार कपूर अशा कलाकारांच्या सिनेमात भुमिका आहेत. एकूणच वेलकम 3 मध्ये संपूर्ण बॉलिवूड अवतरलेलं दिसतंय. सिनेमाचा 3 मिनिटांचा खास व्हिडीओ सध्या चांगलाच लक्ष वेधून घेतोय.
नाना पाटेकर, अनिल कपूर शिवाय मज्जा नाही
वेलकम चे पहिले दोन्ही भाग नाना पाटेकर, अनिल कपूर यांनी गाजवले. नाना आणि अनिल यांनी उदय आणि मजनू भाईच्या भुमिकेत झळकले होते. दोघांची अफलातुन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. पण वेलकम टू द जंगल सिनेमात मात्र नाना आणि अनिल दिसत नाहीत. त्यामुळे प्रचंड निराशा झालीय. अनेक जण नाना आणि अनिल शिवाय वेलकम-3 ला काही अर्थ नाही असं म्हणत आहेत.
कधी रिलीज होणार वेलकम 3
अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त स्वतःला आणि त्याच्या फॅन्सला गिफ्ट दिलंय. वेलकम 3 यावेळी जंगल थिमवर आधारीत असल्याचं समजतंय.
अक्षय कुमारच्या 'वेलकम-3' चं शुटींग लवकरच सुरु होणार असुन हा सिनेमा पुढील वर्षी डिसेंबर 2024 ला ख्रिसमसला रिलीज होणार आहे. इतके सारे कलाकार वेलकम 3 मध्ये असल्याने हा सिनेमा मनोरंजनाचं पॅकेज असणार यात शंका नाही..
अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या फॅन्ससाठी मोठी घोषणा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 09, 2023
Rating:
