सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
आपल्या घरातील वडीलधारी लोकं सांगतात की रोज थोडं चाला. चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वजन कमी करायचं असेल तर रोज चालायला हवं. पण चालण्याने वजन तर कमी होतंच पण इतरही अनेक आश्चर्यकारक आरोग्य फायदे मिळतात.
निरोगी आयुष्य जगावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण त्यासाठी सकस आहारापासून ते दैनंदिन दिनचर्येपर्यंत समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाकडे रोजच्या व्यायामासाठी एक ते दोन तास काढण्यासाठी पुरेसा वेळ नसतो, पण चालणे ही फार नॉर्मल क्रिया आहे, जी तुम्ही सहज पूर्ण करू शकता.
दररोज किती पावले?
अभ्यासानुसार, दररोज किमान २३३७ पावले चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, तर दररोज सुमारे ३९६७ पावले चालल्याने इतर आजारांमुळे मृत्यूचा धोका कमी होतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज ५०० पावले चालणे हृदयविकाराच्या मृत्यूच्या जोखमीमध्ये ७ टक्के कमी होते, तर १,००० पावले चालणे हा धोका १५ टक्के कमी करण्याशी संबंधित आहे. अभ्यास सांगतो की दररोज चालण्याने त्याचे आरोग्य फायदे सतत वाढत जातात. हे परिणाम २२६,८८९ लोकांवर केलेल्या १७ स्वतंत्र अभ्यासांवर आधारित आहेत.
WHO काय म्हणते?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कमी शारीरिक हालचाली हे जगभरातील मृत्यूचे चौथे सर्वात सामान्य कारण आहे. यामुळे दरवर्षी ३.२ दशलक्ष मृत्यू होतात. एका अंदाजानुसार, जगातील एक चतुर्थांश लोक असे जीवन जगतात, ज्यामध्ये शारीरिक हालचाली नसल्यात जमा असतात.
हृदयाच्या समस्या कमी होतील
युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीच्या अभ्यासानुसार, जर तुम्ही दररोज ५०० ते १००० पावले चालत असाल तर हृदयरोग किंवा इतर कोणत्याही कारणामुळे मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
स्नायू बळकट होतात
रोजच्या रोज चालण्याने स्नायू बळकट होतात. विशेषत: पाय, बोटं, कंबर, यामुळे शरीराचं संतुलन चांगलं राहतं. चालण्यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता निर्माण होते. चालण्यामुळे शरीराचा बाक चांगला राहतो.
दीर्घायुष्यासाठी रोज किती पायदळ चालावे? अभ्यास काय सांगतो जाणून घ्या!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 16, 2023
Rating:
