सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
अविनाश लांबट मित्र परिवारद्वारे छोटेखानी आयोजित कार्यक्रमात शशिकांत आंबटकर (काका), अनिल देरकर, युवा उद्योजक प्रवीण बोथले, अनुप महाकुलकर, शंकर लालसरे, पवन ढवस, सरपंच चंद्रकांत धोबे, रवि टोंगे, प्रसाद ढवस, प्रशांत नांदे, वैभव पवार,दिलीप आत्राम, मनोहर गेडाम, प्रामुख्याने उपस्थित होते.
संचालक अवताडे पुढे बोलतांना म्हणाले की, राजकारण आता पूर्वी सारखं राहिले नाही. कोण शत्रू कोण मित्र हे कळायला मार्ग नाही, मात्र हल्ली चाललेले राजकारण खूप गलिच्छ दिसते. त्यामुळे आम्ही आधी मित्र आहोत नंतर मग राजकारण. या निमित्ताने त्यांना त्यांच्या सामाजिक,राजकीय व कौटुंबिक जीवन कार्यास शुभेच्छा. युवानेते तसेच महागांव (सिंधी) ग्रामपंचायत उपसरपंच, सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष तथा मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश लांबट यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महागांव येथे शाळा परिसरात वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
हा उपक्रम दरवर्षी स्वातंत्र्य दिन व जन्मदिन निमित्ताने राबविण्यात येतो. तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने आज मारेगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यामध्ये विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच जेष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील नामवंतांनी श्री लांबट यांना केक कापून अभिष्टचिंतन सह शुभेच्छा दिल्या. या छोटेखानी कार्यक्रमाच्या अनुषंगाने अविनाश लांबट यांनी सर्वांचे शुभेच्छा,आशिर्वाद स्विकारून मनःपूर्वक आभार मानले.
अशा प्रकारचे छोटेखानी कार्यक्रम तुम्हाला स्वतःची नव्याने ओळख निर्माण करुन देत असतात- संचालक अवताडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 16, 2023
Rating:
