शोधण्या अस्तित्व माझे
शोधण्या अस्तित्व माझे
कोण मी? आलो कशाला?
मानवाचा जन्म माझा
धर्म मानवतेचा मिळाला...
नम्रता अन् क्षमाभाव हे
नीज अंतरी माझ्या स्थिरावे
सत्कर्म करण्या बळ मिळावे
ठायी केवळ शून्य उरावे...
उपदेशाचे बोल नको
निजकर्मातून जीवन घडू दे
या मनाच्या धरतीवरती
बंधुभावाचे बीज पडू दे
मी पणा अन् गर्व सारा
संपूनिया पूर्णत्व यावे
सेवा घडावी सदा या हस्ते
इतुके मज ममत्व द्यावे
अर्त माझी हाक तुजला
एकुनी वरदान दे
ज्यांच्या मुळे घडले हे जिवन
त्यांच्या चरणी स्थान दे
शोधण्या अस्तित्व माझे.... पवन कुसुंदल यांचे शब्दात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 02, 2023
Rating:
