सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमित व्यायाम व योग्य आहाराचे सेवन करणे गरजेचं आहे. आजकालच्या बैठी जीवनशैली व लोकांच्या आळशीपणामुळे लोकांमध्ये पूर्वीसारखी उर्जा व ताकद राहिलेली नाही. लगेचच थकवा येतो. थोडं काम केल्यानंतर थकवा का येतो? थकवा घालवण्यासाठी आपण चणे व गुळाचे सेवन करू शकता. चणे कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असतात, तर गूळ लोह आणि पोटॅशियमसारख्या घटकांचा उत्तम स्रोत मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, या दोन गोष्टींच्या नियमित सेवनाने अनेक आजार टाळता येतात.
जाणून घ्या गुळ-चणे खाण्याचे ५ भन्नाट फायदे..
हाडे मजबूत होतात
शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी गुळ आणि चणे खाण्याचा सल्ला मिळतो. चण्यामध्ये आढळणारे कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तिशीत हाडे ठिसूळ होतात, असे होऊ नये म्हणून गुळ - चणे खा. याचे नियमित सेवन केल्याने हाडांसह इतरही आजार दूर होतात.
हृदय निरोगी राहते
हृदय निरोगी ठेवण्यासाठी गुळ-चणे उपयुक्त ठरते. गुळ-चण्यामध्ये आढळणारे पोषक तत्व हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात. तज्ज्ञही ते खाण्याचा सल्ला देतात.
वजन कमी करते
चण्यामध्ये प्रोटीन आढळते. गुळ - चणे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. आपण सकाळी गुळ - चणा खाऊ शकता.
पचनशक्ती वाढवते
चणे आणि गूळ पचनशक्ती निरोगी ठेवण्यास मदत करते. या दोन गोष्टी खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो. या दोन्ही गोष्टी समान प्रमाणात खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
ॲनिमियावर उपाय
अनेक समस्यांमुळे शरीरात रक्ताची कमतरता भासू शकते. अशा परिस्थितीत नियमित चणे आणि गुळ खा. चणे आणि गुळामध्ये लोह पुरेशा प्रमाणात आढळते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.
सकाळी उठल्या उठल्या मूठभर चणे आणि गूळ खा; 5 आजार राहतील लांब...!!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 02, 2023
Rating:
