सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : असं म्हणतात, "काळ आला होता पण आली नव्हती"...काल झालेल्या समृद्धी महामार्गांवरील अपघातात जवळपास तीस जणांच्या वर जळून कोळसा झालेला आहे परंतु यात सात लोकांना जीवदान मिळाल्याचे माहिती समोर आली.
यात सुदैवाने बचावलेला आयुष अनिल गाडगे रा. हिवरा (ता.मारेगाव) हा सुद्धा नागपूर वरून या लक्झरी बसने प्रवास करित होता. त्याने माध्यमांना साधलेला संवाद...त्याने सांगितले संपूर्ण घटनेचा दुर्दैवी प्रवास. तो म्हणाला की, मी बुट्टीबोरी वरून बसलो होतो, शहराच्या बाहेर निघून अंदाजे एक ते दिड वाजले होते. तो झोपलेला होता, त्याच्या अंगावर दोन लोक पडलेले होती. लोक त्याच्या अंगावर पडून असल्याने त्याला जाग आली. तो तिथेच उभा झाला आणि त्याला एक उघडी काच दिसली. त्याला फोडणं आणि बाहेर एक एक पडणं सुरु केले. ज्या खिडकीतून आयुष बाहेर पडला त्यावेळी त्या खिडकीतून त्याच्या अगोदर एक नंतर तो आणि आणखी एक असे दिघे जन बाहेर निघाले,असं तो म्हणाला...
नेमकं काय झाले, कसा अपघात घडला असं जेव्हा त्याला विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, मी तसा झोपलेला होतो, माझ्या अंगावर तीन चार लोक पडलेले, आवज वैगेरे खूप चालू होता. दरम्यान, काहीच कळत नव्हतं. मात्र जो काच त्याला दिसला त्या खिडकीमधून तो बाहेर पडला. ती एकच खिडकी दिसत होती, मधातलं एटी पर्सेंट सर्व जळालं होतं. मी तिथून जसं बाहेर निघालो तस त्याचं ठिकाणी एका मिनिटात आग लागली, असं त्यानं सांगितले.
अपघात घडला तेव्हा त्यांच्या मदतीला कोणी आले होतं का? त्यावर त्याने म्हटलं की, पोलिसांना कोणी तरी माहिती दिली, त्यावेळी तिथे खूप कमी लोक होते. मदतीला माझे मित्र होते. कारण ते सुद्धा दुसऱ्या ट्रॅव्हल्सने प्रवास करित होते. त्यांच्यात आणि माझ्या गाडीत वीस पंचवीस मिनिटाचे अंतर होते. ते पण तिथे आले, पोलीस पण तिथे आले होते.
या घटनेबाबत मित्रांना त्याने कळवले कसे जेव्हा त्याला विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितल की, मी बुट्टीबोरी वरून गाडीत बसलो होतो आणि माझे तीन मित्र वणी (यवतमाळ) वरून बसले होते. "आम्ही सुरुवातीला चारही सोबत निघणार होतो,पण वेळेवर प्लॅन चेंज झाला आणि मी एकटा बुट्टीबोरी वरून निघालो.आणि ते तिघे वणी वरून निघाले. आयुषला माहित होतं की त्याच्या मित्राची ट्रॅव्हल्स त्याच्या गाडीच्या मागे आहे. दरम्यान ते एकमेकांना बोलतच होते, की माझी गाडी या ठिकाणी थांबली, त्या ठिकाणी थांबली आहे. असं त्यांच्यात संभाषण चालूच होते. पुढे सिंधखेड राजा येथे ट्रॅव्हल्स थांबली तिथे जेवण केलं आणि प्रवासात झोप लागली. मग जसं अपघात झाला, तो बाहेर पडला त्या नंतर एक ट्रॅव्हल्स आली. त्यावेळी तो तीस नंबर च्या सर्वात मागच्या सिंगल शीटवर वर बसला होता, त्याने मागून आलेली पर्पल ट्रॅव्हल्स ला विचारलं की, माझे मित्र या गाडी मध्ये आहे. तर गाडीवाल्याने त्याला सांगितलं की वणीची ट्रॅव्हल्स मागे आहे. वीस ते पंचवीस मिनिट लागतील. तेव्हा त्याला वाहन चालकाला कॉल करून सिचव्हेशन सांगितले की,ते आले आणि मग त्या ट्रॅव्हल्स ने आयुष पुढे मार्गस्थ झाला.
अपघात झाला तेव्हा तो बाहेर निघाला आणखी दोन लोक बाहेर पडली, त्यावेळी कितीवेळात त्याला मदत मिळाली, जसं की, हायवे पोलीस, फायरब्रिगेड किंवा वैद्यकीय, पोलीस मदत किती वेळात मदत मिळाली,असं जेव्हा त्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने म्हटलं की, ते सांगता येणार नाही पण मी बाहेर पडलो, वीस पंचवीस मिनिटांनी मागील ट्रॅव्हल्स ने त्याचे मित्र आले. जे बाहेर निघाले त्यांना थोडा थोडा मार लागला होता, मला हाताला थोडंस रक्तान भरलेलं होतं, थोडा फार मार लागला असला तरी त्यावेळी ते फार काही जाणवत नव्हतं, मग त्याचे मित्र आले. पोलिसांना सांगितले की मी परस्पर जात आहे. मग मी त्यांच्या ट्रॅव्हल्सने संभाजीनगर ला निघून गेलो असं त्याने सांगितले.
या धक्कादायक घटनेनंतर ज्या ठिकाणी पोहचला तिकडे आयुष ने उपचार करून घेतला होता, त्यानं अगोदर म्हणजे सकाळी पाच वाजता घरच्यांना कॉल करून सांगितले होतं की मी ठिक आहे. कारण त्याने न्यूज वर बघतील होतं की, मिसिंग वैगेरे.. मात्र अगोदरच घरच्यांना सुखरूप असल्याची माहिती दिली.
पुण्याला फिरायला निघालेल्या आयुष सोबत त्याचे तीन मित्र सुद्धा होते, फक्त फरक एवढाच होता की, त्याचे मित्र दुसऱ्या ट्रॅव्हल्सने मागून येत होते. अपघात झाल्यावर ते ही तिथे पोहचले होते. त्यांनी देखील या भीषण अपघाताबाबत आपली मत व्यक्त केली. बोलतांना मित्र एवढंच सांगत होते की,काही सुचत नव्हतं, संपूर्ण ट्रॅव्हल्स बेचिराख झाली होती, सर्वत्र मृतदेहाचे सापळे पडले,आम्ही आयुष ला शोधत होतो. मग तो दिसला आम्हाला समाधान मिळालं, त्याला बघितल्यावर जोराने मिठी मारली आणि पुढे संभाजीनगर ला अश्रू नयनांनी निघून गेलो, असं त्यांनी माध्यमांना सांगितल.
या भीषण अपघातातून आयुष वाचला, तो या प्रवासातून नशीबवान ठरला आहे.खरं तर काच फोडून तो बाहेर पडला.त्याच्या दोन्ही हाताला किरकोळ जखम झाली. त्याने आपल्या सोबत दोन लोकांना बाहेर काढलं, मात्र शेवटी आयुष म्हणाला की, आम्ही सर्व एकमेकांच्या सपोर्टने बाहेर निघालो... एवढच...!! या अपघातांनंतर ते पुढील प्रवास करित,मात्र बाकी पंचवीस जणांचा कोळसा झाला..
आयुष गाडगेंनी सांगितला समृद्धी महामार्गवरील थक्क करणारा "तो" भीषण अपघात..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 02, 2023
Rating:
