"माझा शेतकरी राजा"
माझ्या शेतात डुले हिरवे गार रान,
शेताला पाहून शेतकऱ्याची होईल उंच मान...
रात्र न दिवस काम करी कष्ट करी
देवा त्याला अन्न मिळूदे त्याच्या घरी...
करतो नांगरण पेरनं, जमिनीत टाकीन बी
येऊदे पीक भरा भर, देवा कडे प्रार्थना करतो मी..
हीच माझी धर्ती, हीच माझी आई
काळया जमिनी शिवाय कोणीच जगऊ शकत नाही...
सारखा बघतो आभाळाकडे, केव्हा पीक येईल वरती
जेव्हा पीक येईल वरती, हिरवी दिसेल धरती...
शेती साठी जगतो रात्रंदिवस,
पीक वरती यायला अजून लागेल किती दिवस...
दिसे झाड हिरवे हिरवे, तसे पान झुरवे झुरवे
इवल्या इवल्या देठाना पान कोवळे कोवळे...
कोवळ्या कोवळ्या पानांना आहे हिरवे देठ
माझ्या शेतकरी बापाचं भरूदे पोट...
झाड मोठ झालं की, देईल खूप पीक,
शेतकरी म्हणतो देवा मला मागाला लावू नको भिक...
माझा शेतकरी राजा - समीक्षा देऊळकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 25, 2023
Rating:
