मनसे नेते राजू उंबरकर कार्यकर्त्यांसह धडकले कोसारा रेती घाटावर

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
         
मारेगाव : नागरिकांना स्वस्त दरात मिळेल रेती, घरकुलांना मिळेल गती! या उद्देशानं राज्य सरकारनं नवीन रेती धोरण जाहीर केलं आहे. रेती पुरवठ्यासाठी सध्या तरी तालुक्याच्या ठिकाणी डेपो तयार करण्यात आले. त्याचा लाभ इतर तालुक्यातील जनतेला मिळतही असतील, पण मारेगाव तालुक्यातील डेपो याला अपवाद ठरत आहे. हजारो ब्रास रेती स्टॉक करून ठेवला असतांनाही लाभार्थ्यांना तिळमात्र रेती दिल्या जात नसल्याने तीव्र संताप जनतेतून व्यक्त होत आहे.

मारेगाव तालुक्यातील एकमेव कोसारा रेतीघाटावरून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात तालुक्यालाच रेतीपुरवठा होत नसल्याने मनसेचे राजू उंबरकर आपल्या कार्यकर्त्यांसह कोसारा घाटावर धडकले हजारो ब्रास रेतीचा स्टॉक नदीकाठावर करून असल्याने ही रेती अवैधरित्या तालुक्याबाहेर जात असल्याचे यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले. 
 

मारेगाव तालुक्यातील कोसारा येथून वर्धा नदी वाहते. येथेच रेतीचा डेपो सुद्धा देण्यात आला. या डेपोमध्ये अवैधपणे रेतीची उचल केली जाते. आणि येथूनच रेती परस्पर बाहेर पाठवल्या जाते, परंतु तालुक्यातील जनतेला मात्र रेती मिळत नाही असा आरोप करीत मनसे नेते राजू उंबरकर यांचे नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाने जेवढा स्टॉक करायची परवानगी दिली त्यापेक्षा जास्त रेतीचा स्टॉक जमा केला असल्याचा आरोपही करण्यात आला.

यावेळी मनसे नेते राजूभाऊ उंबरकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका उपाध्यक्ष सुरज नागोसे, वामन चटकी, आदित्य बुचे, चांद बहादे, रुपेश ढोके, किशोर मानकर, अनंता जुमळे इत्यादी पदाधिकारी व असंख्य मनसैनिक उपस्थित होते.
मारेगाव तालुक्यात एकमेव कोसारा रेती डेपोवर हजारो ब्रास रेतीचा स्टॉक नदीकाठावर केला आहेत परंतु ऑनलाईन पद्धतीने वितरण केली जाणारी रेती केवळ 937 ब्रास ऑनलाईन केल्या गेली उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून रेती पुरवठा तालुक्याबाहेर होत असल्याने घरकुल लाभार्थी तसेच अन्य बांधकामांना रेती मिळत नसल्याने लाभार्थ्यात शासनाच्या 600 रुपये रेती ब्रास धोरणाविषयी नागरिकात कमालीची चीड निर्माण झाली आहे. 

रेती डेपो वरून ऑनलाईन नंबर लावल्यानंतर रेती वितरण केली जाते. या ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यात वा जिल्ह्याबाहेर ही रेतीपुरवठा करता येतो त्यामुळे मारेगाव तालुक्यातील नागरिकांना ऑनलाईन केल्यास रेती मिळू शकते, चौकशी नंतर या रेती डेपोवर जास्तीचा स्टॉक असल्यास कारवाई करू. मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांनी सांगितले.
     रेती डेपो संदर्भात जनतेच्या तक्रारी पहा ✍️

मनसे नेते राजू उंबरकर कार्यकर्त्यांसह धडकले कोसारा रेती घाटावर मनसे नेते राजू उंबरकर कार्यकर्त्यांसह धडकले कोसारा रेती घाटावर Reviewed by सह्याद्री चौफेर on June 24, 2023 Rating: 5
Powered by Blogger.