सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
चंद्रपूर : भारत राष्ट्र समिती चा प्रचार व पक्ष नोंदणी रथ विधानसभा राजुरा 70 मध्ये 47 डिग्री सेल्सिअस तापमानात खेडो पाडी जातो. अनेक गावात भारत राष्ट्र समिती च्या पक्ष नोंदणी साठी गावकरी उन्हात उभे राहून गावात स्वागत करतात.
भारत राष्ट्र समिती चे तेलंगाना चे लोकप्रिय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ह्याचे आभार व अभिनंदन करण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनता उत्सुक असल्याने चित्र ग्रामीण भागात बघायला मिळत आहे. सर्व गोष्ठी नी परिपूर्ण असलेले महाराष्ट्र राज्य हे स्थापन होऊन अनेक काळ झाला तरी मूलभूत सोयी पासून येथील जनता वंचित आहे असे दिसून येते. त्या उलट परिस्थिती के चंद्रशेखर राव ह्यांनी आपल्या राज्यात जनतेला दिली आहे.
तेलंगाणा मधील सर्व सुविधा महाराष्ट्रात लागू करणार हे जेव्हा मला माहिती झाले तेव्हा पासून आम्ही उन्हाची तीव्रता न बघता प्रत्येक गावात भारत राष्ट्र समिती चा झेंडा रोवायला सज्ज झालो आहोत. जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघून आम्हाला उन्हातही थंडी वाजते असे मत आंनदराव अंगलवार, संतोष कुळमेथे, सन्नी रेड्डी, अजय सकीनाला, रेशमा चव्हाण, मीनाक्षी मून,ज्योती नले, अनसुर्या नुती,ह्यांनी बोलून दाखविले.
47 डिग्री सेल्सिअस तापमान मध्ये बी आर एस ला प्रतिसाद
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 09, 2023
Rating:
