सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
या कार्यशाळेकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांच्यामार्फत 18 व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथून 02 कोलाम आदिम जमातीतील अशा एकूण 20 आदिवासी कोलाम बांधवांना कार्यशाळेत जाण्याची संधी मिळालेली आहे. या देशस्तरीय तीन दिवसीय कॉन्फरन्स मध्ये राष्ट्रपती भवन व भारतीय संसद भवन येथे प्रवेश मिळणार आहे.
सदर कार्यशाळेकरिता जाणान्या आदिवासी कोलाम बांधवांना मा. याशनी नागराजन सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा जि. यवतमाळ यांनी दिल्ली येथे जाणान्या सर्व कोलाम बांधवाशां सहानुभूतीने चर्चा करुन पुढील प्रवासा करीता शुभेच्छा दिल्या.
या कॉन्फरन्स मध्ये प्रकल्प समन्वयकाची भूमिका सांभाळण्यासाठी श्री. गोदाजी सोनार सहा. प्रकल्प अधिकारी व श्रीमती. रत्नमाला सिडाम शिक्षण विस्तार अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथील कार्यशाळेत जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी कोलाम बांधव सहभागी होणार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 09, 2023
Rating:
