सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 104 शाळा असून यात 37 उच्च प्राथमिक तर 67 प्राथमिक शाळा आहेत. जवळपास अडीच हजार विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेण्याकरीता या शाळांमधून श्रीगणेशा करतात. विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर तालुक्यात 329 शिक्षकांची आवश्यकता आहे. परंतु सध्या तालुक्यात 221 शिक्षक कार्यरत असून तब्बल 108 शिक्षकांची पदे रिक्त आहे. त्यातही 14 आंतर जिल्हा बदली झाल्याने हा आकडा फुगुन तब्बल 122 शिक्षकांची पदे आजतरी रिक्त आहेत. त्यामुळे या गंभीर बाबी कडे ना लोकप्रतिनिधी, ना सरकार, ना सामाजिक कार्यकर्ते,कोणीही या गंभीर विषयाकडे लक्ष घालत नसल्याचे मत श्री लांबट यांनी सह्याद्री चौफेर ला बोलतांना सांगितले.
आदीवासी बहुल तालुका असल्याने निसर्गाच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या सर्वसामान्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने सर्वसाधारण जिवन जगणाऱ्या पालकांची संख्या मोठी आहे. परिणामी आर्थिक विवंचना मागावर असतांना गलेलठ्ठ शाळेतील प्रवेशासाठी सर्वसाधारण नागरीक इंग्रजी स्कुल सारख्या शाळेला फाटा देवुन आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत करुन शिक्षणाचे धडे गिरवण्याचा इवलासा प्रयत्न करत असतांना येथे मात्र, शिक्षकांची पदे रिक्त असल्याने याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होत आहे. त्यामुळे तात्काळ ज्या शाळेवर शिक्षक नाही किंवा शिक्षकांची गरज आहे तिथे शिक्षक उपलब्ध करून द्यावा अन्यथा परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा अविनाश भाऊ लांबट यांनी निवेदनातून दिला आहे.
तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या शाळा हिवरी, मेंडणी, कानडा, मुक्टा, वेगांव, केगाव, महागांव, टाकळी, रामेश्वर, बामर्डा, मांगली या 11 गावातील जिल्हा परिषद शाळेला गुरुजी नसल्यामुळे या विद्यार्थ्याचा शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हि बाब अतिशय गंभीर आहे, संबंधित विभागाने या शाळांना शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी पालकांसह अविनाश लांबट, सुरेश लांडे, तुळशीराम कुमरे, शुभम भोयर, प्रवीण नान्हे, रामचंद्र जवादे, आशिष खंडाळकर, प्रशांत तोरे, जगदीश ठेंगणे, गजानन आदेवार अमोल कुमरे, गणेश डाऊले, व मारोती तुरणकार यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तालुक्यातील शाळांना "गुरुजी" उपलब्ध करून द्या - अखिल भारतीय सरपंच परिषदेची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 08, 2023
Rating:
