मतदारांच्या मतरुपी आशीर्वादाचा विजय : रविन्द्र शिंदे


• वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलची सत्ता; ईश्वर चिठ्ठीने लागला निकाल

• सभापती डॉ. विजय रामचंद्र देवतळे तर उपसभापती जयंत मोरेश्वर टेमुर्डे

• शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते जयंत टेमुर्डे, करण देवतळे यांचे नेतृत्व

• सत्ता स्थापनेच्या स्पर्धेत रविन्द्र शिंदे यांचे नेतृत्व खरे उतरले




सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलची सत्ताची सत्ता बसली. ईश्वर चिठ्ठीने सदर निकाल लागला. सभापती डॉ. विजय रामचंद्र देवतळे तर उपसभापती जयंत मोरेश्वर टेमुर्डे यांची नियुक्ती झाली.

स्थानिक वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दि. २९ एप्रिल रोजी पार पडली होती. त्यानुसार शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलचे ९ उमेदवार, खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पैनलचे ८ उमेदवार तर एकनाथ शिंदे गटाचा एक उमेदवार असे एकूण १८ उमेदवार निवडून आलेले होते. स्पष्ट बहुमत कोणत्याच पैनलला प्राप्त झाले नाही. शेवटी आज (दि. १२) ला एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार नितीन मत्ते हा धानोरकर गटाला जावून मिळाल्याने दोन्ही पैनल कडे समान उमेदवार झालेत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारीद्वारे दोन ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आल्या. ईश्वर चिठ्ठीनुसार शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलचे डॉ. विजय रामचंद्र देवतळे यांची सभापतीपदी तर जयंत मोरेश्वर टेमुर्डे यांची उपसभापतीपदी निवड झाली. तर उर्वरीत संचालक मंडळात शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलचे संचालक दत्ता बबनराव बोरेकर, विठ्ठल त्र्यंबक भोयर, अभिजित गिरीधर पावडे, सौ. कल्पना ओकेश्वर टोंगे, सौ. संगिता वासुदेव उरकांडे, राजेश वामनराव देवतळे, विलास शालिक झिले यांचा समावेश झाला आहे.

वरोरा विधानसभा क्षेत्रातील वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकरीता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते जयंत टेमुर्डे, करण देवतळे, यांच्या नेतृत्वात शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनल बनविण्यात आली. या पैनलला मतदारांनी कौल दिला होता. सत्ता बसविण्याकरीता एका उमेदवाराची आवश्यकता होती. 

शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलच्या नेतृत्वाने प्रस्थापितांना पाणी पाजत विजय संपादित केला. परिणामी प्रस्थापितांना या विजयाने चांगलेच हादरे बसले. पराजयाचा शिक्का लावून घेण्यापेक्षा फोडाफोडी करून सत्ता बसविता येते का याची चाचपणी पराजित पैनलने सुरू केली होती, तसे प्रयत्न वरोरा येथे झाले. वरोरा येथील एका विजयी उमेदवारास प्रस्थापित नेतृत्वाने गळास लावण्याचा प्रयत्न केले असता तातडीने रविन्द्र शिंदे यांनी सूत्र हलवित आघाडीचे नऊ विजयी उमेदवार सुरक्षित केले व प्रस्थापितांचे प्रयत्न हाणून पाडण्यात विजयी पैनलच्या नेतृत्वाने यश मिळविले होते. लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या उमेदवारांचीच बाजार समितीत सत्ता बसेल, असा मानस शेतकरी सहकार परिवर्तन आघाडीचा होता. वरोरा विधानसभा क्षेत्रात या आधी घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी बघता व रवींद्र शिंदे यांच्या कार्याचा अनुभव बघता प्रस्थापितांना रविंद्र शिंदे हेच टक्कर देवू शकतात त्यामुळे शेतकरी सहकार परिवर्तन आघाडीची सत्ता स्थापनेची सूत्रे रविन्द्र शिंदे यांना देण्यात आली होती. त्यानुसार आगामी रणनीती शिंदे यांनी ठरविली. दिवंगत विधानपरिषदेचे उपाध्यक्ष मोरेश्वरराव टेमुर्डे व दिवंगत आमदार संजय देवतळे यांच्या शेतकरी हिताच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी, यांनी विधानसभा क्षेत्रात राबविलेली सु-संस्कृती व शांततेचे राजकारण तथा विधानसभा क्षेत्रात लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी रविन्द्र शिंदे यांनी प्रयत्न केले. फोडाफोडीचे राजकारण व सत्तेसाठी घोडेबाजार न करता, मतदारांच्या मतरुपी आशीर्वादाचा सन्मान करीत जनतेनी दाखविलेला विश्वास व लोकशाही अबाधित ठेवण्यात शेतकरी सहकार परिवर्तन आघाडीला यश प्राप्त झाले व वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता स्थापन केली, असे रविन्द्र शिंदे म्हणाले.

सदर सत्ता स्थापनेत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते जयंत टेमुर्डे, करण देवतळे, खेमराज कुरेकर, विजय दादाजी मोकाशी, वासुदवे उरकांदे, सुधिर धामट, बापु नौकरकार, ओकेश्वर टोगे, गजानन कुरेकार, विशाल नानाजी पारखी, ईश्वर पावडे, कन्हैयालाल जयस्वाल, गोपाळ गुळघाणे, प्रमोद फरकाडे, विजय रामचंद्र नन्नावरे, सुरेद्र देठे, विकास सोनी, मोतीराम लोहकर, विठ्ठल लेडे, बाबासाहेब भागडे, सचिन चुटे, वासुदेव ठाकरे यांचा या यशात सहभाग आहे.

मतदारांच्या मतरुपी आशीर्वादाचा विजय : रविन्द्र शिंदे मतदारांच्या मतरुपी आशीर्वादाचा विजय : रविन्द्र शिंदे Reviewed by सह्याद्री चौफेर on May 12, 2023 Rating: 5
Powered by Blogger.