सह्याद्री चौफेर | राजू डावे
मारेगाव : लालपुलिया परिसरात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दि. 12 मे ला सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान,घटनास्थळी काही काळ जनभावना उफाळून आल्या होत्या.
शहरालगत असलेला लालपुलिया परिसर हा अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जातो. या परिसरात असलेल्या कोल डेपो (COAL DEPO) मुळे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात नेहमीच वर्दळ असते. तसेच कोलडेपोतील कोळशाच्या साठवणूक व वितरणामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे वाहन चालकांना समोरील वाहनाचा अंदाज बांधता येत नाही.
आज शुक्रवारी दिनांक 12 मे रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या घरातील दोन पाहुणे हे पॅशन या दुचाकीने (MH 29 AH 8391) प्लेट, कप व इतर साहित्य आणण्यासाठी वणीला आले होते. सामान परत घेऊन ते मेघदूत कॉलनीकडे परतत असतांना सकाळी 9 वाजताच्या सुमारास एका हॉटेल समोर ट्रक (MH 34 BG 1983) हा जात होता. या ट्रक'ला ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकचा धक्का दुचाकीला लागला. यात भरधाव ट्रक व दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. दरम्यान,अक्षरशः दुचाकी चा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात दोन तरुणांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मृतक जिवन अनंता कांबळे (15) रा. लहुजी नगर, चंद्रपूर व स्वप्नील माणिकराव चांदोळकर (26) रा. खैरगांव चंद्रपूर अशी या दोन युवकांची नावे आहे. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. एसडीपीओ संजय पुज्जलवार, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, वणी वाहतूक उपशाखा प्रमुख संजय आत्राम, एपीआय माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, सपोनि आशिष झिमटे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तणावपूर्ण परिस्थिती हाताळली.
पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास पोलीस प्रशासन करित आहे.
लालपुलिया परिसर हा अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जातो. येथील रस्ता च्या बाजूला उभे असलेल्या ट्रका वर कडक कार्यवाही वाहतूक विभागाने करावी, नाहक नागरीकाचे जीव जाता आहे. यासाठी वाहतूक विभागाने ठोस पाऊले उचलावी - नागरिक
लाल पुलीया वर भिषण अपघात; दोन जन जागीच ठार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 12, 2023
Rating:
