यवतमाळ आगारात दाखल झालेल्या प्रदूषण विरहित बसेसचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारात दाखल झालेल्या नवीन तंत्रज्ञानाच्या बी.एस.६ प्रदूषण विरहित १० साध्या बसेसचे लोकार्पण आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री यांनी फीत कापून व पूजा करून बसेसचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी बसची पहाणी केली व बस चालवण्याचा आनंदही घेतला. उपस्थित अधिका-याकडून त्यांनी अद्यावत यंत्रणा असलेल्या बसची इत्यंभुत माहिती जाणुन घेतली. अशा आणखी नवीन ४० बसेस विभागास प्राप्त करून देण्याकरिता पाठपुरावा करून बसेस मिळवून देण्याचे आश्वासित केले.

बस स्थानकाच्या स्वच्छतेबाबत व बस स्थानकातील रोड दुरूस्ती करण्याबाबतच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यानी दिल्या. उपस्थित चालक,वाहक यांच्याशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी उपमहाव्यस्थापक श्रीकांत गभणे, यवतमाळ आगर प्रमुख दिप्ती वड्डे, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, विभाग वाहतूक अधिकारी उमेश इंगळे, कामगार अधिकारी सुनिल मडावी, विभागीय लेखा अधिकारी गणेश शिंदे,वाहतूक निरिक्षक हरीष थोरात तसेच बस स्थानकातील प्रवासी उपस्थित होते.
यवतमाळ आगारात दाखल झालेल्या प्रदूषण विरहित बसेसचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण यवतमाळ आगारात दाखल झालेल्या प्रदूषण विरहित बसेसचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण Reviewed by सह्याद्री चौफेर on May 11, 2023 Rating: 5
Powered by Blogger.