मार्डी येथील वादळ वाऱ्याने घराचे छप्पर उडविले

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : त्या दिवशी मध्यरात्री 1 वाजता आलेल्या वादळी वाऱ्याने मार्डी येथील एका राहत्या घराचे टिनपत्रे उडून गेले असून सुदैवाने जीवित हानी टळली आहे. ही घटना बुधवारी घडली.

राहुल धोपटे तथा रामू धोपटे असे वादळी वाऱ्याने राहत्या घरावरील छत्र उडून गेलेल्या नुकसानग्रस्ताची नावे आहेत. गेल्या काही दिवसापासून अवकाळी आहे पावसाचा अधून मधून कहर सुरूच आहे. बुधवारच्या रात्री 1 वाजता सम्पूर्ण गाव गाढ झोपेत असताना अचानक वादळी वारा तथा मेघगर्जनेसह पाऊस झाला,यामध्ये इतर काही जणांचे किरकोळ नुकसान होऊन धोपटे यांचे राहते घरचं उध्वस्त झाले आहे.
दरम्यान,घराची झालेल्या या गंभीर स्थिती मुळे वास्तव्य करणाऱ्या धोपटे कुटुंबाची तारांबळ उडाली होती. मात्र, घरावरील टिन पत्रे घरा बाहेर पडल्याने झोपी गेलेल्या घरातील व्यक्तीचा सुदैवाने जीव वाचला आहे. मात्र, अशा वातावरणात वाताहत झालेल्या नुकसान ग्रस्ताना आर्थिक मदत मिळावी अशी आर्त हाक मागणी होत आहे.
मार्डी येथील वादळ वाऱ्याने घराचे छप्पर उडविले मार्डी येथील वादळ वाऱ्याने घराचे छप्पर उडविले Reviewed by सह्याद्री चौफेर on May 11, 2023 Rating: 5
Powered by Blogger.